संकलीत होणारा कचरा १५ दिवसात स्थलांतरीत करण्याची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |
 
 संकलीत होणारा  कचरा १५ दिवसात स्थलां तरीत करण्याची मागणी
यावल , ०९ मार्च 
शहरातून दररोज संकलीत होणारा कचरा बोरावल रस्त्यालगत डीपी रोडवर न टाकता तो नियोजित घनकचरा व्यवस्थापना साठी मिळालेल्या जागेवर १५ दिवसाच्या आत स्थलांतरीत करण्यात यावा अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा पालीकेतील नगरसेवकांच्या एका गटाने मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
 
 
 शहरातून दररोज ७ ते ८ टन सुका व ओला कचरा ठेकेदारामार्फत संकलित करण्यात आला. वर्षभरापासून हा संकलित कचरा बोरावल रस्त्यालगत पालिकेच्या पाणी शुद्धीकरण केद्राजवळच तयार करण्यात आलेल्या डीपी रोडवर टाकण्यात येत आहे. यामुळे या परिसरात मोठया प्रमाणात प्लास्टिक पिशव्या पसरल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी पालीकेकडे जागा व निधी उपलब्ध असून सुद्धा  चार वर्षापुर्वी पालिकेने कर्ज काढून तयार केलेल्या रहदारीच्या रस्तावरच कचरा टाकण्यात येत आहे. रस्त्याने वापरणाऱ्या शेतकऱ्यांसह शेतमजुरांना मोठया प्रमाणात दुर्गधीचा सामना करावा लागत असल्याने  पालिकेविषयी संताप व रोष व्यक्त होत आहे. 
 
पालिका प्रशासनाने पाणी शुद्धतेसह नागरीकांच्या आरोग्याबाबतचा प्रश्न गाभीर्याने घेत जनआदर करीत १५ दिवसाच्या आत रस्त्यावरील कचरा आरक्षित जागेवर स्थलांतरीत करावा अन्यथा जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल वसंतराव पाटील, नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, नगरसेविका सौ. रुख्माबाई भालेराव, नगरसेविका .देवयानी गिरीष महाजन, नगरसेविका  पौर्णिमा राजेंद्र फालक, नगरसेविका  नौशाद मुबारक तडवी, यांनी पालीका प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
गेल्या वर्षभरापासून शहरातील ओला व सुका कचरा संकलनाचे काम ठेकेदाराद्वारे सुरु होते. २८ फेब्रुवारीपासून  ठेक्याची  मुदत संपल्याने काही प्रमाणात स्वच्छ व सुंदर दिसणाऱ्या शहरात पुन्हा अस्वच्छता पसरली आहे. ठेक्याची मुदत संपण्याच्या आठ दिवस आधी ठेका मुदतवाढ बाबत प्रक्रिया राबविणे अपेक्षित होते मात्र जाणिवपुर्वक दुर्लक्ष केलाने शहरात अस्वच्छता पसरल्याचा आरोप नगरसेवक अतूल पाटील यांनी केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@