समायोजनादरम्यान कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |





शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आश्वासन

मुंबई : शाळा समायोजित करताना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासंदर्भातील तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते विधानपरिषदेत बोलत होते. दरम्यान, ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा शाळांचेच समायोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.


२० पटसंख्येच्या खाली असलेल्या शाळा बंद करण्याबाबत निर्णय पूर्वी घेण्यात आला होता. मात्र, पहिल्या टप्प्यात १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा समायोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची संख्या ५६८ असल्याचे तावडे म्हणाले. गुणवत्तापूर्वक आणि स्पर्धात्मक वातावणात विद्यार्थी घडावेत अशी यामागील संकल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच समायोजित शाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळत असून समायोजनेमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जास्त पटसंख्या असलेल्या कोणत्याही शाळांचे समायोजन करण्यात आले नसून चुकीच्या पद्धतीने समायोजन झाल्याचे नावानिशी निदर्शनास आणून दिल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले. दरम्यान, याबाबत योग्य मार्ग काढण्यासाठी तसेच चर्चेसाठी सभापतींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.


अर्धवेळ शिक्षकांना सेवेत समावून घेणार
अतिरिक्त अर्धवेळ शिक्षकांना पुन्हा सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन तावडे यांनी यावेळी दिले. दरम्यान, ९१ अर्धवेळ शिक्षकांना पुन्हा सेवेत समावून घेण्यात येणार आहे.


शिक्षकेतर कर्माचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध

माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचा-यांचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे तावडे म्हणाले. याबाबतच समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केलाआहे. सदर प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असून वित्त विभागाच्या मान्यतेनंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंध करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@