अनधिकृत बांधकाम प्रकरणी अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |



दोषींवर कारवाईचे नगरविकास राज्यमंत्री आश्वासन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सी प्रभागात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या असून अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. तसेच या प्रकणातील दोषींविरूद्ध कठोर कारवाईचे आश्वासनदेखील त्यांनी यावेळी दिले.


मुंबई महानगरपालिकेच्या सी प्रभागात अनधिकृत बांधकामे उभारली असल्याची लक्षवेधी विधानपरिषद सदस्य राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केली होती. त्या लक्षवेधीला उत्तर देताना देताना पाटील बोलत होते. अनधिकृत बांधकांविषयी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सदर इमारतींची महानगरपालिकेतर्फे पाहणी करण्यात येते. तसेच अधिकृत बांधकामे आढळल्यास सदर बांधकांमांना नोटीसा बजावण्यात येत असून त्यांना सदर बांधकाम तात्काळ हटवण्यास सांगितले जात असल्याची माहिती नगरविकास मंत्र्यांनी दिली. अनधिकृत बांधकाम धारकाने बांधकाम वैध असल्याचा पुरावा सादर न केल्यास किंवा अनधिकृत बांधकाम न हटवल्यास पालिकेमार्फत पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
@@AUTHORINFO_V1@@