'मानवाधिकारांचे दमन करणाऱ्या देशालाच मानवाधिकारांची चिंता'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |

संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा भारताकडून पाकची बोलती बंद




जिनेव्हा :
'जो देश सातत्याने आपल्या भूमीमध्ये मानवाधिकारांचे दमन करत आला आहे, आज त्याच देशाला जम्मू-काश्मीरमधल्या जनतेच्या मानवाधिकारांची चिंता होऊ लागली आहे.' असा खरमरीत टोला भारताच्य राजदूत मिनी देवी कुमाम यांनी काल पाकिस्तानला लगावला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेच्या काल जिनेव्हा येथे झालेल्या बैठकीमध्ये त्याबोलत होता.

जम्मू काश्मीरमध्ये भारत सातत्याने मानवाधिकारांचे दमन करत आहे, असा आरोप पाकिस्तानने या बैठकीमध्ये भारतावर केला होता. यावर 'राईट टू रिपलाय' अंतर्गत भारताने पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. 'जम्मू काश्मीरवर भाष्य करणाऱ्या पाकिस्तानने अगोदर आपल्या देशातील मानवाधिकारांचे दमन थांबवावे' प्रतिपादन भारताकडून कुमाम यांनी केले.

पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तून या भागांमध्ये मानवाधिकारांचे दमन करत आला आहे. आपल्या शेजारी देशांना त्रास देण्यासाठी दहशतवादाचा आश्रय घेत आहे आणि असे असूनच आज भारतावरच तो मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा आरोप लावत आहे. ज्याने देशाने स्वतःच्या भूमीत कधीही मानवाधिकारांची चिंता केली नाही, त्या देशाला आता काश्मीरमधील मानवाधिकारांची चिंता वाटू लागली आहे. हे अत्यंत आश्चर्याची बाब आहे' अशी टीका कुमाम यांनी केली.

याच बरोबर जम्मू-काश्मीरची मूळ समस्या ही दहशतवाद असून यामागे देखील पाकिस्तानचाच हात असल्याचे त्यांनी म्हटले. आज सर्व जगाला हे माहित झालेले आहे कि पाकिस्तान हा नेहमी दहशतवादाला पाठीशी घालत आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदाने अगोदर पाकिस्तानला आपल्या देशातील दहशतवाद हद्दपार करण्याचे आदेश द्यावेत. तसेच आपल्या देशात सुरु असलेल्या मानवाधिकारांची दमन अगोदर थांबवावे,' असे कुमाम यांनी म्हटले.
@@AUTHORINFO_V1@@