विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांची पुनावृत्ती करण्यास भाग पाडू नका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |
विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांची पुनावृत्ती करण्यास भाग पाडू नका
मोढाळे प्र.अ.येथील दाम्पत्य शेतकरी कुटूंबाचा भूसंपादन प्राधिकरण प्रशासनास इशारा
 
• महामार्ग चौपदरीकरण कामावर घेतली हरकत काम केले बंद
•जमिनीची खोटी कारवाई करणाऱ्या अधिकारीविरुद्ध कारवाई न झाल्यास आत्महदहन करण्याचा इशारा
पारोळा-
तालुक्यातील मोंढाळे प्र.अ. येथील मुरलीधर परबत पाटील व पत्नी बेबाबाई मुरलीधर पाटील यांच्या स्वमालकीची जमीन गट न 6 व 186    महामार्ग 6 लगत असलेली दोघे बाजूची जमीन मुरलीधर पाटील व दामपत्य ची असून त्यांनी त्यांच्या जमिनीतून जाणारे तरसोद ते फागणे दिल्या गेलेल्या ठेकेदारास व कंपनीला अडवून महामार्ग 6 चे दोघे बाजूचे काम बंद केले आहे.
 
महामार्गाचे काम बंद केल्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पाटील  यांनी सुनावले की,आमच्या जमिनीची खोटी कारवाई करणाऱ्या आधिकार्याविरुद्ध कारवाई न झाल्यास व आमच्या जमिनीची शासनाच्या दडपशाहीने आम्हास तुरुंगात टाकून आमची जमीन घेण्याचा सपाटा झाल्यास,आमची बळजबरीने जमीन घेणाऱ्या शासनाविरुद्ध प्राणाची आहुती देऊ व त्याचा अगोदर आमच्या जमिनीची रक्कम शेतातच घेऊ असा पवित्रा पाटील दाम्पत्याने घेतला आहे.  आलेल्या संबंधित अधिकार्याच्या पथकाने  पाटील याना सांगितले की,तुमच्या जमिनीची मोबदला रकम जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही व तुमची जमीन देणेबाबत संमती नाही तोपर्यंत कुठल्याही पोलीस बळाचा वापर करून तुरुंगात टाकून तुमची जमीन घेतली जाणार असा विश्वस त्यांनी व्यक्त केला. मुरलीधर पाटील याची स्वमलकीची जमीन गट न 6 मधुन राष्ट्रीय महामार्ग 6 ओलांडून गट न186 मध्ये नेलेल्या पाण्याची पाईप लाईन मोजणीचे आदेश संबंधित नियुक्त भुसपादन अधिकारी यांना दिले आहेत.परंतु या कार्यालयातून आजपर्यंत कुठलीही दखल घेण्यात आली नाही.विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांची संबंधित आधिकात्यानी वेळेवर दखल घेतली नाही व याउलट त्यांना हतबल केले म्हणून त्यांना जग सोडून जावे लागले. त्याचे काम वेळेवर झाले असते तर त्यांना जग सोडून गेले नसते असा गंभीर आरोप देखील श्री पाटील यांनी सारकारावर केले आहे.सरकार ला खरा अवहवाल पाठवा व गेलेला खोटा अवहवाल रद्द करा व शासनकामी जमीन देणाऱ्या शेतकरी कुटूंबाला न्याय द्या अशी मागणीही त्यांनी  केली आहे
 
@@AUTHORINFO_V1@@