महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव करून यश गाठावे : जिल्हाधिकारी पुलकुंडकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |


बुलडाणा : महिला आता समाजातील प्रत्येक क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती करीत आहे. त्यांच्या प्रगतीला समाजानेही सलाम केला आहे. ज्या महिलांनी यश गाठले आहे, ज्या यशाच्या शिखरावर आहेत. त्यामुळे समाजातील इतर महिलांनी आपल्या अधिकाराची जाणीव करून जीवनात यशाची नवे शिखरे गाठावीत, असे वक्तव्य जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त सहस्त्रक महिला मतदार, उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्काराचा कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
समाजात महिलांना दुय्यम स्थान देण्याच्या विचार आता इतिहासजमा झाला आहे. त्याच प्रकारे स्त्रीभ्रूणहत्या हा शब्द देखील आता इतिहासजमा झाला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. तसेच यासाठी आता महिलांनीच पुढाकार घेऊन महिलांच्या अधिकाराबाबत सजग झाले पाहिजे व स्त्री भृण हत्या प्रकाराला समाजातून दूर नेले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच वंशाचा दिवा हा केवळ मुलगाच बनू शकतो, असे नाही तर मुलीही वंशाला पुढे नेत असल्याचे सध्या दिसत आहे. त्यामुळे समाजाने आता आपल्या मानसिकतेत बदल केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान या कार्यक्रमामध्ये या वर्षी वयाची १८ वर्ष पूर्ण करून सहस्त्रक मतदार झालेल्या युवतींचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@