पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |
 

भाजपकडून गेही कुटुंबातच उमेदवारी; खाविआ पाठिंबा देणार


 
जळगाव :
प्रभाग क्रमांक २६ ‘ब’ च्या पोटनिवडणुकीत भाजपचे दिवंगत नगरसेवक विजयकुमार गेही यांच्या कुटुंबातच उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेण्याचा निर्णय भाजपच्या पदाधिकार्‍यांनी घेतला आहे.
 
 
शहरातील प्रभाग क्रमांक २६ ‘ब’ चा परिसर हा सिंधी कॉलनी भागात येतो. नगरसेवक विजयकुमार गेही हे याच भागातील रहिवासी होते. २०१३ ची निवडणूक त्यांनी भाजपच्या माध्यमातून लढवून विजय मिळविला होता. त्यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या या जागेसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून ६ एप्रिलला मतदान होणार आहे.
 
 
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी तसेच महानगर अध्यक्ष आमदार सुरेश भोळे, माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी, महापालिका विरोधी पक्षनेते वामनराव खडके, गटनेता सुनील माळी यांची बैठक झाली. या बैठकीत पोटनिवडणुकीची उमेदवारी गेही कुटुंबातच द्यावी, असा निर्णय झाला.
 
 
गेही यांचे पुतणे धिरज गेही यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा झाली. या संदर्भात खाविआ नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचीही लवकरच भेट घेण्याचा निर्णय झाला.
 

...तर सर्वानुमते निर्णय घेऊ - गेही यांच्या कुटुंबातच उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला आणि ही निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रस्ताव दिला तर त्यावर सकारात्मक भूमिका घेऊन सत्ताधारी खाविआ पाठिंबा देणार असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. या उलट जर भाजपकडून गेही कुटुंबीयांव्यतिरिक्त दुसर्‍या व्यक्तीला उमेदवारी दिली तर खाविआकडून सर्वानुमते भूमिका जाहीर केली जाईल, असेही समजते.

 

प्रशासनाकडून तयारी सुरू - या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडूनही तयारी सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिजित भांडे पाटील यांची तर सहाय्यक म्हणून निवडणूक शाखेतील तहसीलदार थोरात यांची निवड होण्याची शक्यता आहे. दोन दिवसात या संदर्भात आदेश निघणार असल्याची माहिती मिळाली. असल्याने चार ते पाच महिन्यांचा काळ उरतो. त्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षही फारसे उत्सूक नाहीत. भाजप वळगता खाविआ, राष्ट्रवादीकडून चार ते पाच जण इच्छुक असल्याचे सूत्रांकडून समजते.

@@AUTHORINFO_V1@@