‘केशवस्मृती’ घेणार नीलेश भीलची जबाबदारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |

कोथळी गाठून माय-लेकांशी साधला संवाद


 
मुक्ताईनगर :
तालुक्यातील कोथळी येथील राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भील याच्या भविष्यातील संगोपनासाठी जळगाव येथील ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ पुढे सरसावले आहे.
 
 
प्रतिष्ठानचा उपक्रम असलेल्या ‘समतोल प्रकल्प’ या संस्थेच्या प्रतिनिधींनी बुधवारी नीलेशच्या घरी भेट देत संवाद साधला. शैक्षणिक सत्रातील परीक्षा आटोपल्यानंतर नीलेशला जळगावला नेणार असल्याचे ‘समतोल’च्या प्रकल्प प्रमुख सपना श्रीवास्तव यांनी सांगितले.
 
 
प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी कोथळी येथील नीलेशचे घर गाठले. प्रकल्पप्रमुख सपना श्रीवास्तव, सहप्रकल्पप्रमुख प्रदीप पाटील यांनी नीलेश व त्याची आई सुंदरबाई भील यांच्याशी चर्चा केली.
 
 
नीलेश हा कोथळी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सातवीत शिकत आहे. पुढील महिन्यात त्याची वार्षिक परीक्षा आहे. येणार्‍या नवीन शैक्षणिक वर्षात जून महिन्यापासून नीलेशला समतोल प्रकल्पाचे पदाधिकारी शिक्षणासाठी जळगाव येथे घेवून जाणार आहेत. यानंतर दोघांनी जिल्हा परिषद मराठी शाळेत मुख्याध्यापक लक्ष्मण कुरकुरे यांची भेट घेतली.
 
@@AUTHORINFO_V1@@