देशातील ८० टक्के जनता झाली एलपीजी गॅसधारक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |

मोदी सरकारच्या काळात गॅसधारकांच्या संख्येत २४ टक्क्यांनी वाढ






नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांमध्ये देशातील कोट्यावधी सामान्य नागरिकांपर्यंत गॅस कनेक्शन पोहचले असून देशातील गॅसधारक नागरिकांची संख्या ८० टक्क्यांवर जाऊन पोहोचली असल्याची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन वर्षांच्या आत यामध्ये २४ टक्यांनी वाढ झाली असून सरकारने स्वीकारलेल्या नवीन धोरणांचा हा परिणाम असल्याचे भाजपकडून बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नमो अॅप'च्या माध्यमातून ही माहिती जनतेसमोर आली आहे. भाजप सरकारच्या अवघ्या तीन वर्षांच्या काळामध्ये देशातील गॅस धारकांच्या संख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली असून तीन वर्षात तब्बल ७ कोटी ग्राहकांना नवे गॅस कनेक्शन मिळाले आहे. त्यामुळे सध्या देशातील ८० टक्के जनता ही एलपीजी गॅसधारक बनली असून घरगुती कामांसाठी एलपीजीचा वापर करत असल्याचे यात म्हटले आहे. या अगोदरच्या सरकारच्या काळामध्ये हे प्रमाण फक्त ५४ टक्के होते असे देखील यात म्हटले आहे. त्यामुळे भाजप सरकार हे पूर्णपणे सामान्य जनतेचा विचार करूनच कार्य करत आहे, असे भाजपकडून बोलले जात आहे.




 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी 'पंतप्रधान उज्ज्वला योजना' सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत साडे तीन कोटींहून अधिक कुटुंबाना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. तसेच पेट्रोलियम मंत्रालयाने देखील या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून यामुळे देशात एलपीजी गॅसचा वापर वाढत आहे. तसेच लवकरच देशातील सर्व जनतेपर्यंत ही एलपीजी गॅस पोहोचवण्याचे सरकारचे ध्येय असल्याचेही भाजपने म्हटले आहे.


@@AUTHORINFO_V1@@