तालिबानच्या म्होरक्यासह २१ दहशवादी ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |

काबुल : अफगाणिस्तानमध्ये असलेल्या पाकिस्तान तालिबानच्या दहशतवाद्यांविरोधात अमेरिकेने आज आणखीन एक मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या  तालिबान्यांच्या एका शिबिरावर अमेरिकेने ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला असून या हल्ल्यामध्ये २१ दहशतवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तान तालिबानचा म्होरक्या मुल्ला फैजुल्ला या मुलगा देखील या हल्ल्यात मारा गेल्याचे येथील स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. परंतु अमेरिकेने मात्र अद्याप या कारवाईसंबंधी कसलीही माहिती दिलेली नाही.


अफगाणिस्तानच्या पूर्वेला पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुनार प्रांतामध्ये अमेरिकेने ही कारवाई केली आहे. पाकिस्तान जवळ असलेल्या तालिबान्यांच्या शिबिरावर आज सकाळी अमेरिकेने ड्रोनच्या सहाय्याने दोन क्षेपणास्त्र डागली. यामध्ये फैजुल्लासह एकूण २१ तालिबान्यांचा मृत्यू झाला. तसेच मोठ्या प्रमाणावर त्यांचा शस्त्रसाठा आणि इतर साहित्य देखील नष्ट करण्यात अमेरिकेला यश आले. फैजुल्लाचा मुलगा या हल्ल्यात ठार झाल्यामुळे तालिबान विरोधात हे अमेरिकेला मिळालेले हे एक मोठे यश मानले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@