गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी १४ कोटीं रुपयांचा निधी वितरीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |

शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश




यवतमाळ : गेल्या महिन्यात जिल्ह्यात झालेल्या गारपीटमुळे शेतमालाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून १४ कोटी रुपयांची मदत जिल्ह्याला देण्यात आली आहे. हा निधी काल रात्रीच सर्व तालुक्यांना वितरीत करण्यात आला असून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

गेल्या महिन्यात १२ आणि १३ तारखेला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. झालेल्या मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले होते. या गारपीटमुळे जिल्ह्यात एकूण ११ हजार ९० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले. यानंतर जिल्हा प्रशासनाने या संदर्भात सर्व्हे करून शासनाकडे अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एकूण १४ कोटी ३ लक्ष ३१ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला गेल्या मंगळवारी सायंकाळी मिळाला. त्यानंतर हा सर्व निधी कालच तालुक्यांना वितरीत करण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@