मानवी तस्करीविरोधात महिला आयोगात विशेष कक्ष सुरू करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |


आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची घोषणा


मुंबई : महाराष्ट्र राज्य आयोगामध्ये लवकरच मानवी तस्करीविरोधात कक्ष सुरू करणार असल्याची घोषणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली.



आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आम्ही उद्योगिनी संस्थेच्या मिनल मोहाडीकर, संयुक्त राष्ट्रसंघ विकास संस्थेच्या (यूएनडीपी) आफरीन सिद्दिकी, अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष, आयोगाच्या सदस्या विंदा कीर्तिकर, अॅड. आशा लांडगे आणि सदस्य सचिव डाॅ. मंजुषा मोळावणे उपस्थित होत्या


महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण यासारख्या अनेक अन्यायाला बळी पडणाऱ्या आणि नैराश्यग्स्त झालेल्या महिलांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत 'सुहिता' ही हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली. ७४७७७२२४२४ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत महिलांना संपर्क साधता येणार येणार आहे. सदर हेल्पलाइन सुरू झाल्यापासून राज्याच्या कानाकोपऱ्यातुन ५५० महिलांनी संपर्क केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान रहाटकर यांनी यावेळी मानवी तस्करीविरोधातील तक्रारींचे वाढते प्रमाण लक्षात घेता, आयोगामध्ये विशेष कक्ष स्थापन करणे आणि तस्करीच्या पीडितांचे पूनर्वसन करण्यासाठी 'आम्ही उद्योगिनी' आणि संयुक्त राष्ट्रसंघाची विकास संस्था (यूएनडीपी) यांच्या मदतीने कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला.
@@AUTHORINFO_V1@@