थक्कबाकीमुळे पालिकेचाच पाणी पुरवठा झाला 'खंडित'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |


कोल्हापूर : तब्बल २१ कोटी रुपयांची पाणी थकबाकी ठेवल्यामुळे पाणीपुरवठा खंडित करण्याची नामुष्की कोल्हापूर महानगरपालिकेवर काल ओढवली. २१ कोटी रुपयांची थकबाकी जमा न केल्यामुळे कोल्हापूर पाटबंधारे विभागाने महापालिकेचा पाणी पुरवठा काल खंडित केला, परंतु पालिकेने ३ कोटी रुपयांची रक्कम तात्पुरत्यास्वरुपात जमा केल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर महापालिकेने पाण्याची थकबाकी जमा केली नव्हती. या संबंधी पाटबंधारे विभागाने कोल्हापूर महापालिकेला वारंवारपणे नोटीस बजावून थकबाकी जमा करण्याविषयी निर्देश दिले होते. परंतु महापालिकेने याकडे वारंवारपणे दुर्लक्ष करत, विभागाच्या नोटीसला केराची टोपली दाखवली. यानंतर काल दुपारी विभागाने कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता पालिकेचा पाणीपुरवठा खंडित केला. यानंतर पालिकेमध्ये एकच गोंधळ उडाला व पाटबंधारे विभागाला पाणीपुरवठा सुरु करण्याची विनंती करण्यात आली, परंतु विभागाने थकबाकी जमा करण्याचे निर्देश दिल्यानंतर पालिकेने तातडीने ३ कोटी रुपये जमा केले, तसेच उरली सर्व थकबाकी येत्या १५ दिवसांमध्ये जमा करण्याचे आश्वासन दिले. यानंतर विभागाने पाणीपुरवठा पूर्ववत सुरु केला.
@@AUTHORINFO_V1@@