बामणोद येथे परीक्षा सुरू होण्यापुर्वी चाकु हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |
 
 
बामणोद येथे परीक्षा सुरू होण्यापुर्वी चाकु हल्ला
जळगाव, 8 मार्च
यावल तालुक्यातील बामणोद येथील पीएसएमएस या विद्यालयात 10 वीचा पेपर सुरू होण्यापुर्वी चाकु हल्ला झाला यात 4 जण जखमी झाले असून हल्लेखोरास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरूवार रोजी 10 वीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास विद्याथ्र्यांमध्ये वाद झाला .यातुन एका मुलाने चाकुहल्ला केला यात रुपेश नन्नवरे, गौरवर सोनवणे, सागर सोनवणे, मोहित सोनवणे सर्व राहणार बामाणोद हे जखमी झाले. चाकु हल्ला करणा­या मुलास वर्गात बंद करून ठेवण्यात आले .घटनेची माहिती मिळताच सपोनि दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. हल्लेखोर मुलगा हा अंजळे येथील असल्याची माहिती समोर येत आहेत. जखमींना उपचारासाठी भुसावळला रवाना करण्यात आले.
पेपर सुरू होण्यापुर्वी झालेल्या या प्रकाराने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.पोलीसांनी विद्यार्थ्यानची भिती दुर केली. परिक्षा केंद्रावर पोलीसांचा बंदोबस्त असतो असे असतांना चाकुहल्ला झाला. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@