देशात महिला संरक्षणासाठी आंदोलन व्हायला हवे : सुषमा स्वराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : देशात महिला संरक्षणासाठी रोज आंदोलन व्हायला हवे असे मत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले आहे. आज महिला दिनानिमित्त राज्यसभेत बोलतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. केंद्र आणि राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षीततेसाठी संकल्प करायला हवा आणि यातून महिलांची सुरक्षितता जोपासायला हवी असेही त्या यावेळी म्हणाल्या. महिला आरक्षण विधेयकाचे यावेळी सुषमा स्वराज यांनी समर्थन केले.
 
 
आज महिला वायूदल, लष्कर आणि नौदल या तिन्ही क्षेत्रात अग्रेसर आहेत तसेच अंतराळ, विमान चालक , जहाज चालक अशा पुरुषांच्या मत्तेदारी असणाऱ्या सगळ्या क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कवायतीत महिलांनी बाईकवरून कसरती करून दाखविल्या यात देखील पुरुषांची मत्तेदारी होती. मात्र यावेळच्या प्रजासत्ताक दिनी प्रथमच महिलांनी बाईकवरून कवायती करून दाखविल्या त्यामुळे या क्षेत्रात देखील महिलांनी पुरुषांची मत्तेदारी बरोबरीने केली अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
 
मात्र एकीकडे आपली मान गौरवाने उंचावते मात्र एकीकडे तिला शरमेने झुकावे देखील लागते. म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येवून महिलांसाठी काही महत्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. महिलांचे संरक्षण होईल तरच आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून खरोखर सार्थक होईल असे त्यांनी यावेळी म्हटले.
 
 
राज्यसभेत हा विषय मांडण्यासाठी त्यांना वेळ दिला गेला यासाठी सुषमा स्वराज यांनी सभापतींचे आभार मानले तसेच त्यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या संपूर्ण जगातील महिलांना शुभेच्छा दिल्या. 
 
@@AUTHORINFO_V1@@