नारी शक्ती पुरस्काराचे राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |

 

 
 
 
 
 
नवी दिल्ली : नारी शक्ती पुरस्कार २०१७ चे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवन येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आज भारतातील काही महत्वाची कामगिरी केलेल्या महिलांचा या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
 
 
 

सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, तंत्रज्ञान, महिला व बाल आणि आर्थिक क्षेत्रांत ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केली या महिलांना आज मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे. या महिलांच्या कामगिरीवरून इतर महिलांनी प्रेरणा घ्यावी आणि त्यांनी देखील समाजासाठी आपले चांगले योगदान द्यावे. इतर महिलांनी प्रेरणा घ्यावी यासाठी या महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. या महिला आपल्या देशाचा गौरव आहे असे शब्द रामनाथ कोविंद यांनी यावेळी व्यक्त केले.

 
 
 

या कार्यक्रमात रामनाथ कोविंद यांनी सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा आवर्जून उल्लेख केला आणि त्यांचा देखील सन्मान केला. त्यांच्या जीवनाला सलाम आहे त्यांनी शेकडो अनाथांना आईची माया लावली. आईचे हृदय हे नेहमीच मोठे असते असे आदरार्थी वाक्य त्यांनी त्यांच्याबद्दल उद्देशून म्हटले. आजच्या कार्यक्रमात ज्या महिलांचा सन्मान करण्यात आला त्या सगळ्या महिलांच्या कर्तुत्वाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सलाम केला.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@