घरे देण्याच्या नावाखाली फसवणाऱ्यांभोवती कायद्याचा फास आवळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |




एम.पी.आय.डी. कायद्यात सुधारणा करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : ग्राहकांच्या हितार्थ एम.पी.आय.डी. कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत दिली. गृह प्रकल्पामध्ये घरे देण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विकासकावर कठोर कारवाई करण्यासाठी व ग्राहकांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.


मुंबईतील एन.डी.डेवकॉन प्रा.लि. या बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या संचालकांनी ग्राहकांची केलेल्या फसवणुकीबीबत आ. किरण पावसकर यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या प्रकरणात विकासकाने एकेका घराची दोन तीन जणांना विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांची 18 खाती गोठवण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अन्य दोन आरोपी परदेशात असून त्यांनादेखील परत आणण्याचे प्रयत्न सुरू प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


रखडलेले गृहप्रकल्प म्हाडाकडे?


गृह प्रकल्पात फसवलेल्या ग्राहकांना भाडेतत्वावर जागा देण्याबाबत किंवा रखडललेले गृह प्रकल्प म्हाडाकडे हस्तांतरित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल,असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदस्य प्रविण दरेकर यांनी विचारलेल्या उप प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@