बालगुन्हेगारी कायद्याविषयी धडे अभ्यासक्रमातून घेण्यावर विचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |

शिक्षण विभागाला कळवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 
 
 
मुंबई : गेल्या वर्षी मिळालेल्या आकड्यांनुसार घडलेल्या गुन्ह्यांमध्ये १६ ते १८ या वयोगटातील मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे बालगुन्हेगारीच्या कायद्याविषयीचे धडे अभ्यासक्रमात सामिल करता करण्याबाबत शिक्षण विभागाला कळवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिले. वाढत्या बालगुन्हेगारीवर विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
 
राज्यात बाल गुन्हेगारांसाठी ३५ बाल न्यायालये आणि सर्व जिल्ह्यांमध्ये बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सर्व पोलीस स्थानकांमध्ये विशेष बाल पथकांची स्थापना करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच बालसुधारगृहातून बाहेर आलेल्या आणि वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचे स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने पुनर्वसनाचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यावर विचार केला जात असल्याचेही ते म्हणाले. सध्या गुन्हेगारीकडे मुले वळू नयेत यासाठी अभ्यासक्रमात राष्ट्रीय मूल्यांच्या शिक्षणाचा विषय समाविष्ट केला असून त्यांच्या स्वयंसरक्षणाच्या उपाययोजनाही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 
ऑपरेशन मुस्कानचा अनेकांचा फायदा
 
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत २०,११२ बालकांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवण्यात आले असल्याचे माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच अनाथ विद्यार्थी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत असून त्यासाठी चाईल्ड एड सोसायटी कार्यरत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
ऑन ड्युटी आठ तास
 
मुंबईत पोलिसांचे काम करण्याचे तास कमी करून ते प्रायोगिक तत्वावर आठ तास करण्यात आले आहे. राज्यात इतरही ठिकाणी याबाबत काय करता येईल याचा विचार करण्यात येईल, असे या चर्चेतील उप प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@