पोलीस पाटलांच्या मानधनाबाबत दोन महिन्यांमध्ये निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन

 
 
 
 
 
मुंबई : राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनाबाबत पुढील दोन महिन्यांमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिले. अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या राज्यस्तरीय सचिव समितीकडून दोन महिन्याच्या आत अहवाल प्राप्त करून घेवुन मानधन वाढीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
विधानपरिषदेचे सदस्य रामहरी रूपनवार यांनी पोलीस पाटलांच्या समस्यांवर उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना ते बोलत होते. पोलीस पाटील हे गाव पातळीवर अतिशय महत्त्वाचे कर्तव्य बजावत आहेत. असे असतानाही त्यांना काम केवळ ३ हजार रूपये मानधनावर काम करावे लागत आहे. २०१४ मध्ये त्यांच्या मानधनात वाढ करून तो ७ हजार रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंलबजावणी अद्यापही का करण्यात आली नाही, असा सवाल विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. तसेच यासाठी नेमलेल्या समितीला वर्ष होऊन गेले तरी अद्याप अहवाल सादर झाला नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. दरम्यान, दोन महिन्याच्या आत समितीकडून अहवाल प्राप्त करून घेऊन मानधन वाढी संदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले.
 
दोन महिन्यांत पुरस्काराचे वाटप
 
२०१२ सालापासून पोलीस पाटलांना दिले जाणारे विशेष उल्लेखनीय आणि शौर्य पुरस्कार देणे ही बंद असून त्या पुरस्कारांचेही २ महिन्यात वाटप करण्यात येतील, असे आश्वासन केसरकर यांनी यावेळी दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@