चीनला शत्रू म्हणून नव्हे तर मित्र म्हणून पहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |

चीनी परराष्ट्र मंत्र्यांचे सर्व देशांना आवाहन




बीजिंग : 'चीन शत्रू म्हणून नव्हे तर आपला एक चांगला मित्र म्हणून पहा' असे आवाहन चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी आज केले आहे. बीजिंग येथे आयोजित 'नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या १३ व्या बैठकीत ते बोलत होते. चीन आणि त्याचे शेजारील राष्ट्र यांच्या संबंधांवर त्यांनी यावेळी भाष्य केले. चीनचे शेजारील राष्ट्र त्याला एक धोका म्हणून पाहत आहेत, परंतु असे न करता. सर्वांना चीनला एक चांगला मित्र म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

'चीन सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो. आपल्या शेजारी देशांशी असलेले संबंध अधिक दृढ आणि चांगले कसे होतील. यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करत असतो. आपल्या शेजारी देशांना संकटकाळी मदत करण्यासाठी देखील चीन नेहमी पुढाकार घेतो. परंतु जगातील काही विचारवंतांनी चीन हे धोकादायक राष्ट्र असल्याचे नवीन तर्क मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक देश चीनला त्याच दृष्टीने पाहत असून हे अत्यंत चुकीचे आहे' असे यी यांनी म्हटले आहे.

तसेच दक्षिण चीनी सागरामध्ये शांतता आणि सुरक्षितता नांदावी म्हणून चीन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे जपानने देखील चीनला शत्रू न मानता एक चांगला मित्र म्हणून स्वीकारावे व चीनी सागराला सुरक्षित ठेवण्यासाठी चीनला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. याच बरोबर चीनने अमेरिकेशी कसल्याही प्रकारची स्पर्धा करत नसून अमेरिकेने देखील आपल्या मनात चीनविषयी असलेली अढी काढून टाकावी, असे त्यांनी म्हटले. तसेच अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात चांगले संबंध निर्माण व्हावे, म्हणून आम्ही सर्व प्रयत्न करू असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी बोलताना दिले.
@@AUTHORINFO_V1@@