तब्बल २५ वर्षांनंतर फारुख टकलाची घरवापसी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2018
Total Views |

दुबईहून अटक करून आणले भारतात 


मुंबई : १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आणि दाउद इब्राहिम याचा निकटवर्ती समजला जाणाऱ्या फारुख टकला याला आज भारतामध्ये परत आणण्यात सीबीआयला यश आले आहे. टकला याला दुबईमधून अटक करून भारतात आणले असून आज दुपारी त्याला न्यायालयसमोर हजर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

आज सकाळीच एअर इंडियाच्या एआय १९९६ या विमानाने टकलाला दुबईहून नवी दिल्ली येथे आणण्यात आले आहे. त्यानंतर त्याला मुंबईला आणण्यात आले आहे. सध्या टकलाला कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये सीबीआयच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. १९९३ मधील बॉम्बस्फोटासंबंधीचे सर्व पुराव्यांसह आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे व त्यानंतर त्याच्यावरील खटला पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे.

दरम्यान टकलाला अटक करून भारतात परत आणणे हे भारतीय तपास यंत्रणेचे सर्वात मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे. १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये टकला हा मुख्य आरोपी आहे. या साखळी बॉम्बस्फोटामध्ये त्यावेळी २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून टकला हा फरार होता. १९९५ मध्ये मुंबई पोलिसांनी त्याविषयी रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती. त्यामुळे त्याला अटक करून भारतात आणणे हे अत्यंत मोठे यश आहे, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@