तिरंगी सामन्यात श्रीलंकेची विजयी सलामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |

भारतावर पाच गडी राखून विजय




कोलंबो :
भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात कालपासून सुरु झालेल्या तिरंगी लढतीच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा पाच गडी राखून पराभव केला आहे. भारतीय संघाने दिलेले १७४ धावांचे आव्हान श्रीलंकेने पाच गडी राखून लीलया पार केले असून श्रीलंकेने या मालिकेतील आपली पहिली विजयी सलामी दिली आहे.

कोलंबोतील प्रेमादासा मैदानावर झालेल्या या सामन्यातमध्ये श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळाच्या सुरुवातीलाच भारताला दोन मोठे धक्के देण्यात श्रीलंकन संघाला यश आले. पहिल्या दोन षटकांमध्येच कर्णधार रोहित शर्मा (०) आणि सुरेश रैना (१) हे दोन्ही फलंदाज माघारी फिरले. अशावेळी मनीष पांड्येच्या जोडीने भारताचा स्फोटक फलंदाज शिखर धवन याने श्रीलंकच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. धवन अवघ्या ४९ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ६ षटकारांसह ९० धावांची खेळी केली. त्याला उत्तम साथ देत पांड्येने देखील ३७ धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. यानंतर रिषभ पंत याने २३ तर दिनेश कार्तिक यांनी नाबाद १३ धावा करून भारताची धावसंख्या ५ बाद १७४ वर नेली. याबदल्यात श्रीलंकेकडून दुष्मंथा चामिरा याने भारताचे २ गडी बाद केले तर जीवन मेंडीस, नुवान प्रदीप आणि धनुश्का गुणतिलका या तिघांनी प्रत्येकी एकएक बळी घेतले.



यानंतर आलेल्या श्रीलंकन संघाने अत्यंत आक्रमकपणे आपल्या खेळाला सुरुवात केली होती. श्रीलंकेचा कुशल मेंडीस याने सुरुवातीलच दोन चौकार लगावत श्रीलंकच्या धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न केला, परंतु मेंडीस ११ धावांवर माघारी धाडण्यास भारतीय संघाला यश आले. परंतु यानंतर आलेल्या पेरेरा याने गुणतिलकासह दुसऱ्या बळीसाठी तब्बल ६८ धावांची भागीदारी रचली. पेरेरा याने आपल्या आक्रमक खेळीच्या बळावर ३७ चेंडूंमध्ये ६६ धावांची खेळी करून श्रीलंकेचा पाया मजबूत केला. यानंतर चंडीमल (१४), थरंगा (१७), दुसान शंका (नाबाद १५) आणि थिसारा पेरेरा (नाबाद २२) यांनी भारतीय संघाने दिलेले १७५ धावांचे आव्हान पाच राखून लीलया पार केले.

पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर आता भारतीय संघाचा सामना बांगलादेश संघाबरोबर होणार आहे. हा सामना श्रीलंकेच्या स्थानिक वेळेनुसार उद्या संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. भारतावरील विजयानंतर सध्या श्रीलंका गुणतालिकेत अव्वलस्थानी आला आहे.

भारताचा डाव :
 

 
श्रीलंका डाव : 



@@AUTHORINFO_V1@@