समांतर रस्त्यासाठी 125 कोटी मिळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |
 
 
 
 समांतर रस्त्यासाठी 125 कोटी मिळणार
जळगाव - शहरातील समांतर रस्त्यासाठी शहरातील नागरिकांनी आंदोलन केले होते.त्या समांतर रस्त्यासाठी आज केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आ.एकनाथराव खडसे, आ.राजुमामा भोळे, खा.ए.टी नाना पाटील,खा.रक्षा खडसे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची बैठक झाली या बैठकीत या समांतर रस्त्यासाठी 125 कोटी निधी देण्याचे मंजुर झाले असुन त्याचबरोबर जळगाव औरंगाबाद चौपदरी करणाला ही हिरवा कंदील मिळाला आहे.
शहरातुन जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर अनेक जणांचे प्राण जात असल्याने या रस्त्याला समांतर रस्ता पाहिजे यासाठी काही दिवसापुर्वी नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले होते.त्यावेळेस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी लेखी हमी दिली होती.त्यानंतर पुन्हा या रस्त्याच्या कामाला खोड बसला होता.या समांतर रस्त्याचे काम सुरू व्हावे यासाठी तात्काळ निधी मिळावा म्हणून आज केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी याच्यासोबत दिल्ली येथे आ.एकनाथराव खडसे,आ.राजुमामा भोळे, खा.ए.टी.नाना पाटील, खा.रक्षा खडसे जिल्हाधिकारी व प्रभारी मनपा आयुक्त किशोर राजे निंबाळकर याची बैठक झाली.याबैठकीत कालिका माता मंदिर ते खोटे नगर यावर मुख्य रस्ता 7.30 किमी सिमेट काक्रीटचा रस्ता होईल.या रस्त्याच्या दोन्ही बाजुने समांतर रस्ते डांबरीकरणाचे होतील यांच्यासह तीन बोगदे या रस्त्यावर क्रॉसिंगसाठी तयार करण्यात येतील. हे तीन बोगदे गुजराल पेट्रोल पंप,अग्रवाल चौक, शिव कॉलनी याठिकाणी होतील. या समांतर रस्त्यांच्या साईडला फुट पाथ व गटार राहतील. तसेच मुख्य रस्ता व समांतर रस्ता यामध्ये 2 मीटरचे दुभाजक राहतील व स्ट्रीट लाईट सुध्दा असतील असे या समांतर रस्त्यासाठी केंद्राकडून 125 कोटीचा निधी मिळणार आहे.असे या बैठकीत निर्णय झाला.त्याचबरोबर जळगाव ते औरंगाबाद चौपदरीकरण होणार असल्याचे सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@