अट्टल घरफोडया स्था.गु.शाखेकडून जेरबंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |
 
 
अट्टल घरफोडया स्था.गु.शाखेकडून जेरबंद
जळगाव, 7 मार्च
पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी फरार आरोपीतांना शोध घेणे कामी स्था.गु.शाखेचे पो.नि. सुनिल कुराडे यांना सुचना दिल्या होत्या . त्या अनुषंगाने कुराडे यांनी स.फौ. सुभाष पाटील, पो.ना. रविंद्र पाटील, प्रकाश महाजन, अशोक चौधरी, विनायक पाटील, इद्रीस पठाण यांना फरार आरोपीच्या शोधकामी परभणी येथे पाठविले होते.
पाचोरा पोलीस ठाण्यात भाग 5 गु.र. नं. 178/2014 या गुन्हयातील आरोपी दिपकसिंग प्रकाशसिंग जुन्नी वय 30 रा. राजीवगांधी नगर , जळगाव हल्ली मुक्काम परभणी हा गुन्हा झाल्या पासून फरार झाला होता.त्याचा शोध घेवून स्था.गु.शा. पोलीसांनी त्यास पाचोरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@