‘मिशन साहसी’सारख्या उपक्रमांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला वचक बसेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |





 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई : “स्त्री जेवढी स्वावलंबी होईल, तेवढीच देशाचीही प्रगती होईल. ’मिशन साहसी’सारख्या उपक्रमांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गेले महिनाभर सुरू असलेल्या या उपक्रमाचा सांगता सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानात पार पडलेल्या या कार्यक्रमात ७ हजारांहून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

“स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने विद्यार्थिनींकरिता ’मिशन साहसी’ हा एक प्रेरणादायी उपक्रमअसून, हा उपक्रमकेवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रात, देशभरात याचा प्रचार झाला पाहिजे, त्यासाठी शक्य ती सगळी मदत करण्यात येईल,’’ असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.

“जेव्हा स्त्री कमावती असते तेव्हा ती लक्ष्मीचे रूप असते, जेव्हा ती ज्ञानदान करत असते तेव्हा ती सरस्वती असते. अगदी याचप्रमाणे जेव्हा एखादी स्त्री संकटात असते तेव्हा तिने दुर्गेचे किंवा चंडिकेचे रूप घेणे आवश्यकच आहे. अशा संकटाच्या वेळीच मिशन साहसीसारखे उपक्रमउपयोगी ठरतात,’’ असे मत लोकप्रिय अभिनेत्री रविना टंडन यांनी प्रतिपादित केले.

“ज्या संस्कृतीत महिलांना देवीचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे, त्याच समाजात त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हाही चिंतेचा विषय बनत चालला आहे. स्वसंरक्षणासाठी कोणा दुसर्‍यावर अवलंबून राहण्याऐवजी स्त्रीने स्वत: सबल असावे, अशी अभाविपची भूमिका आहे. केवळ महिला सशक्तीकरणाबद्दल न म्हणता, तशी कृती करण्यावर संघटनेचा भर राहिला आहे. मिशन साहसी या उपक्रमाचा उद्देशही युवती व महिलांना स्वसंरक्षणसिद्ध करण्याचाच होता,’’ असे अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यांनी नमूद केले.

आजच्या उपक्रमात विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाची सांगता यावेळी अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर देखील उपस्थित होते.

 

काय आहे ‘मिशन साहसी?’

गेल्या काही दिवसांत ठाकूर महाविद्यालय, जुहूचे एसएनडीटी संकुल, सोमय्या महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ मैदान, माटुंगा जिमखाना या ठिकाणी ‘मिशन साहसी’च्या उपक्रमांतर्गत स्वसंरक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी निधी यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमात ‘मिशन प्रहार’ संस्थेचे ग्रँडमास्टर शिफूजी उर्फ भारद्वाज यांच्या मार्गदर्शनान सात हजार तरुणींना स्वसरंक्षणाचे प्रशिक्षण दिले. ‘मिशन साहसी’ एक पाऊल आहे, ज्याद्वारे महिलांना सशक्त बनवून त्यांची शारीरिक अत्याचार व शोषण या दुष्टचक्रातून मुक्त होऊ शकेल. लोकांच्या ’चलता है’ मानसिकतेमुळे महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. हा दृष्टिकोन बदलणे हे या उपक्रमाचे लक्ष्य आहे. आमचा असा विश्वास आहे की, स्वसंरक्षण हा महिलांमध्ये आंतरिक गुण तयार झाला पाहिजे, जेणेकरून महिला येणार्‍या कुठल्याही संकटाचा निर्भीडपणे सामना करू शकतील. हा एक स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमहोता, ज्याद्वारे १४ ते २५ वयोगटातील मुलींना सर्वोत्कृष्ट मार्शल आर्ट्‌सचे प्रशिक्षण प्रशिक्षित व्यक्तींकडून प्रदान करण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@