नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा डिसेंबर, २०१९ अखेर पूर्ण होईल.

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही
पहिल्या टप्प्यात ५० लाख प्रवासी क्षमतेचे टर्मिनल उभारणार
 
 
  

 
 
मुंबई : नवी मुंबई येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम दोन टप्प्यात होणार असून यातील पहिला टप्पा डिसेंबर, २०१९ अखेर पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिली. या पहिल्या टप्प्यात टर्मिनलची एक इमारत व एक रनवे यांचा समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या विमानतळाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, या प्रकल्पामधील ९८ टक्के प्रकल्पग्रस्तांनी संमतीने पुनर्वसन स्वीकारले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ५० लाख प्रवासी क्षमता असलेली टर्मिनल इमारत आणि एक रनवे यांचा समावेश असेल. डिसेंबर, २०१९ अखेर पहिला टप्पा पूर्ण होणार असून त्यानंतर दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीत दुसरा टप्पा पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
नवी मुंबई जमीन विनियोग (सुधारित) विनियम, २०१५ नुसार प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेले भूखंड त्यांनी अन्य विकसकास हस्तांतरित केल्यास त्या विकासकाकडून हस्तांतरण शुल्क, पायाभूत सुविधा विकास शुल्क आकारले जाते. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी स्वतः भूखंड विकसित केल्यास त्यांना मात्र हे शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे नुकसान होणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, भाजप आमदार प्रशांत ठाकूर, आदींनी सहभाग घेतला.
@@AUTHORINFO_V1@@