पुतळे तोडण्याच्या कृत्यावरून पंतप्रधान मोदी नाराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |

 
नवी दिल्ली : त्रिपुरा येथे रशियन नेता ब्लादिमर लेनिन आणि तामिळनाडू येथे पेर्रीयार यांचे पुतळे तोडण्याच्या कृत्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुतळे तोडणाऱ्या जमावावर कठोर कारवाई केली जावी, असा आदेश त्यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांना दिला आहे.
 
 
राजनाथसिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर गृह मंत्रालयाने संबंधित राज्यांनी , अशा घटनांमध्ये सामील झालेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ६ मार्च रोजी दक्षिण त्रिपुरा येथील बेनोलिया येथे हिंसक जमावाने रशियन राज्यकर्ता लेनिन यांचा पुतळा हटवला होता, त्याचबरोबर तामिळनाडूयेथील वेल्लोर जिल्ह्यात द्रविड चळवळीचे नेते पेर्रीयार यांच्या पुतळ्याला देखील फोडण्यात आले.
 
 
सर्व राज्यांनी पुतळे तोडण्याच्या अशा कृत्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी सूचना गृहमंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी याबाबत काल तत्काळ त्रिपुरा येथील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठीच्या सूचना तेथील राज्यपाल यांना दिल्या होत्या. त्याबाबत आज सर्वच राज्यांना लिखित सूचना पाठवली गेली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@