गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात अजामिनपात्र गुन्हा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |

कायदा अधिक कठोर करण्याचे गिरीश बापट यांचे आश्वासन

 
 
 
 
 
मुंबई : गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल केला जावा यासाठी कायदा करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दिली. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. तसेच राज्यात सुरु असलेल्या गुटखा विक्रीवर कडक कारवाई करण्यासाठी याचा तपास हा दक्षता पथकामार्फत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
राज्यात गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने गुटखाबंदी करण्याच्या कायद्यात बदल करून तो अधिक कठोर करणार असल्याचे बापट म्हणाले. तसेच गुटखा तयार करून त्याची विक्री आणि तस्करीला पाठिंबा देणा-या अधिका-यांवर कारवाई करणार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या संगनमताने गुटखा तयार करून त्याची विक्री आणि तस्करी करण्यात येते. तसेच संशयित आरोपींची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.
 
 
भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय करणार नाही
 
या कायद्यात बदल करून तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि हा गुन्हा अजामीनपात्र केला जाईल. तसेच सध्या गुटखा प्रकरणी आलेल्या प्रकरणांची दक्षता विभागाच्या सहयुक्तांमार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. तसेच या चौकशीच्या अहवालाने मुंडे यांचे समाधान न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल. मात्र, यातील कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.
 
 
सहा वर्षांत ११४ कोटींचा गुटखा जप्त
 
सध्या हा गुन्हा जामीनपात्र आब त्यामुळे गुटखाबंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीला खीळ बसली आहे. जनतेच्या आरोग्याचे हित ध्यानात घेऊन हा कायदा अधिक कठोर करणार असल्याचे बापट म्हणाले. तसेच २०१२ ते २०१८ या काळात राज्यात ११४ कोटी २० लाख रुपयांचा गुटखा अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जप्त केला असून कुठेही गुटखा निर्मिती, विक्री आणि तस्करी आढळली तर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई करत असल्याचे राज्यमंत्री मदन येरावर यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@