गेल्या दशकभरात मार्च महिना तेजीच्या बैलांच्या हुंदडण्याचाच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |
 

 दहापैकी सहा वर्षांच्या मार्चमध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक सकारात्मक
 २००८,२०१२,२०१३व २०१५ चा अपवात वगळता मार्च महिना तेजीचाच
 २०१४,२०१६ च्या मार्चमध्ये सेन्सेक्सची ७ टक्के उसळी
 देशात साखरेचे अभूतपूर्व उत्पादन, निर्यातीची गरज

  
 
गेल्या दशकभरापासून मार्च महिना हा जवळपास शेअर बाजारातील तेजीच्या बैलांच्या हुदडण्याचाच राहिलेला आहे! फक्त अपवाद २००८ व २०१५ या वर्षांचा राहिलेला असून २०१२ व २०१३ मध्ये बाजारात किरकोळ घसरण तेवढी झाली होती. त्यामुळे गेल्या फेबु्रवारीत अर्थसंकल्प सादरीकरणानंतर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांची ५ टक्के घसरण होऊनही मार्च महिन्यात सुधारणेस वाव असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. या दहापैकी सहा वर्षांच्या मार्च मध्ये हे निर्देशक सकारात्मक(पॉझिटिव्ह) राहिले होते.
 
 
२००७ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक(निफ्टी) यांनी अनुक्रमे २० हजार बिंदू व सहा हजार बिंदूंची मानसशास्त्रीय पातळी पार केली होती. २००८ च्या जानेवारीच्या पूर्वाधातही या निर्देशांकांनी त्यावेळेपर्यंतची सर्वोच्च पातळीही गाठली होती. (सेन्सेक्सने २१ हजार २०० तर निफ्टीने सहा हजार ३०० बिंदूंपर्यंतची) तत्कालीन सर्वोच्च पातळीही गाठली होती. पण अमेरिकेतील होम लोन बबल(गृहकर्जाचा बुडबुडा) फुटताच शेअर बाजार जोरात कोलमडत गेलेला होता. त्यानंतर सुमारे वर्षभर तो सावरलाही नव्हता.
मार्च २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच त्या महिन्यात सेन्सेक्स तब्बल १३ टक्क्यांनी वधारला होता. मे मध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तर सेन्सेक्स व निफ्टीला वरचे सर्किट लावण्याची वेळ आली होती. त्यापुढील म्हणजे २०१० व २०११ या वर्षांच्या माचर्र्र्मध्येही सेन्सेक्स प्रत्येकी पाच टक्क्यांनी वाढला होता. २०१२ व २०१३ मध्ये मात्र याच महिन्यात सेन्सेक्सला ‘ग्रहण लागले’ होते. २०१२ मध्ये तो एका टक्क्याने घसरला होता. २०१३ मध्ये तर त्याची वाढ किंवा घटही झालेली नव्हती.
 
 
२०१४ च्या मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर केंद्रात नरेंद्र मोदी सरकार येण्याचे संकेत मिळू लागल्याने सेन्सेक्स ७ टक्क्यांनी उसळला होता. त्यानंतर बाजाराला ‘अच्छे दिन’ येत गेले होते. मात्र त्याच्या पुढील वर्षी म्हणजे २०१५ मध्ये मार्च महिन्यात सेन्सेक्स ५ टक्क्यांनी घसरला होता. तर २०१६ मध्ये पुन्हा सेन्सेक्सने ७ टक्क्यांची उसळी घेतली होती. २०१७ च्या मार्चमध्येही तो २ टक्क्यांनी वाढला होता.
यावर्षीच्या मार्चमध्ये मात्र अजूनही सेन्सेक्सची वाटचाल नकारात्मकतेकडे सुरुच असून तो ३३ हजार ७०० ते ३४ हजार
 
बिंदूंदरम्यान घुटमळत आहे. निफ्टीदेखील १० हजार ४०० ते १० हजार ६०० बिंदूंच्या दरम्यान (रेंजबाऊंड)च राहिलेला आहे.
गेल्या फेबु्रवारीत भारतीय शेअर बाजारातून ११ हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केलेल्या विदेशी गुंतवणुकदारांनी या दशकभरातील प्रत्येक मार्च महिन्यात मोठी गुंतवणूक केलेली आहे. २००८ मध्ये त्यांनी याच महिन्यात ३३ हजार कोटींची, २००९ मध्ये २३ हजार कोटींची व २०११ मध्ये २२ हजार कोटींची गुंतवणूक केली होती. पण देशातील म्युच्युअल फंडांनी मात्र गेल्या दशकभरातील मार्च महिन्यांमध्ये शेअर बाजारात विक्रीच केलेली आहे. २००८मध्ये त्यांनी १० हजार कोटींची, २००९ मध्ये ४ हजार कोटींची तर २०१५ मध्ये ३८०० कोटींची विक्री केली होती.
 
 
साखरेच्या उत्पादनात गेल्या पाच महिन्यांमध्ये ४२ टक्के वाढ झालेली आहे. त्यामुळे साखरेचे एकूण उत्पादन २ कोटी ३० लाख टनांपर्यंत गेलेलेे आहे. त्यामुळे येत्या सहामाहीत सुमारे १५ लाख टन साखरेची निर्यात करण्याची गरज असल्याचे भारतीय साखर कारखाना संघटने(इस्मा)ने म्हटले आहे.
 
 
यावर्षीचे अभूतपूर्व साखर उत्पादन झालेल असून व २०१८-१९ मध्ये त्याची पुनरावृत्ती होणार असल्याचे लक्षात घेता येत्या सहा ते सात महिन्यात किमान १५ लाख टन साखरेची निर्यात होणे आवश्यक असल्यावर भरही इस्माने दिला आहे. यावर्षीच्या फेब्रुवारीअखेर देशात ४७९ साखर कारखाने कार्यरत असून या वर्षात ४३ कारखान्यांनी ऊसाचे गाळप बंद केले आहे. तसेच आणखीही काही कारखाने लवकरच येत्या काही आठवड्यांमध्ये गाळप बंद करणार असल्याचेही इस्माने एका निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असल्याचेही इस्माने दाखवून दिले आहे. त्यामुळे सरकारने साखरेवरील निर्यात शुल्क हटविण्याची मागणीही इस्माने केली आहे. साखरेच्या या अतिरिक्त उत्पादनामुळे तिचे भाव पडल्यास शेतकर्‍यांना एफआरपीनुसार त्यांच्या ऊसाला भाव देणे अशक्य होणार असल्याचा इशाराही इस्माने दिलेला आहे.
 
 
सकाळी वाढलेला शेअर बाजार घसरला दुपारी!
शेअर बाजारात आज मंगळवारी सकाळी चांगली वाढ झाली होती. सेन्सेक्स व निफ्टी हे बाजाराचे दोन्ही निर्देशांक सकाळी अनुक्रमे सुमारे तीनशे व ऐंशी बिंदूंनी वधारले होते. पण दुपारी दोन वाजेनंतर अचानक सेन्सेक्स सुमारे दीडशे बिंदूंनी तर निफ्टी शंभर बिंदूंनी गडगडला होता. बँक निफ्टी तर त्याच्या दिवसभरातच्या उच्च पातळीवरुन सुमारे पाचशे बिंदूंनी कोसळला होता. दिवसअखेरीस सेन्सेक्स, निफ्टी व बँक निफ्टी हे अनुक्रमे ३३ हजार ३१७ , १० हजार २४९ व २४ हजार ४४८ बिंदूंवर बंद झाले. बाजारात अजूनही घसरण सुरुच असल्याचे चित्र आजही दिसून आले.
 
@@AUTHORINFO_V1@@