जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ एप्रिलला लोक अदालत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |


 
 
जळगाव :
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
यावेळी मोटार वाहन, ट्रॉफीक चलान, भूसंपादन, धनादेश न वटणे, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युन्सिपल अपिल, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते, असे संपूर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
 
 
त्याचप्रमाणे जळगाव येथील औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालय येथील तडजोड योग्य प्रकरणे देखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@