कर्नाटकचे लोकायुक्त विश्वनाथ शेट्टी यांच्यावर चाकूहल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
बेंगळुरु : कर्नाटकचे लोकायुक्त विश्वनाथ शेट्टी यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात चाकूहल्ला करण्यात आला. यावेळी हल्लेखोराने ३ वेळा चाकूने वार केले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
 
 
या हल्ल्यातून शेट्टी बचावले असून त्यांना पुढील उपचारांसाठी माल्या या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेतली. तसेच या घटनेमुळे कायदा आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून सिद्धरामय्या सरकार कोणत्या पद्धतीची सुरक्षा पुरवत आहे असा सवाल देखील प्रत्यक्षदर्शींनी उपस्थित केला आहे.
 
 
तसंच हल्लेखोर व्यक्ती ही तुमकुरुचे ठेकेदार होता, त्याने लोकायुक्तांकडे काही निविदा मागवल्या होत्या तो एकटा आला असून त्याने न्यायाधिशांना मारहाणही केली, मात्र शेट्टी यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@