प.बंगालमध्ये श्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची विटंबना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |



कालीघाट :
भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना पश्चिम बंगालमधील कालीघाट येथे घडली आहे. कालीघाट येथे असलेल्या मुखर्जी यांच्या अर्धपुतळ्याच्या चेहऱ्याला काळे फासून त्यांची विटंबना करण्यात आली आहे. पुतळ्याखाली बंगाली भाषेमध्ये काही मजकूर लिहिण्यात आला आहे. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात तणाव वाढला असून विद्यापीठाच्या आवारात सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे. तसेच या संबंधी सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

आज सकाळी काही अज्ञातानी विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करून पुतळ्याची विटंबना केली. या अज्ञातांची अद्याप ओळख पटली नसून डाव्या पक्षांच्या काही कार्यकर्त्यांकडूनच हा प्रकार करण्यात आला असल्याचा संशय स्थानिक भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पक्षाचे पश्चिम बंगालचे सचिव सायंतन बसू यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून हे अत्यंत निंदनीय कृत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.



दरम्यान आज सकाळी तामिळनाडूमध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली आहे. त्रिपुरातील लेनिनचा पुतळा हटवल्यानंतर द्रविडयन चळवळीचे नेते 'पेरियार' यांच्या कोइम्बतुर येथे असलेली पुतळ्याची देखील नासधूस करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये देखील या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@