गटशेती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या गटांना २०० कोटी रुपयांचा निधी - सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मुंबई : कृषीक्षेत्राचे उत्पन्न सन २०२१ पर्यंत दुप्पट करण्याचा शासनाचा मानस असून त्यादृष्टीने कृषी आणि कृषीसंलग्न क्षेत्रात शासन भरीव गुंतवणूक करत आहे. २० शेतकऱ्यांचा एक गट व त्यांची किमान १०० एकर शेत जमीन याप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा गट स्थापन करून शेतीचा शाश्वत विकास साधण्यासाठी शासनाने २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
 
 
सह्याद्री अतिथीगृहात आयोजित नदी पुनरुज्जीवन या विषयावरील कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. कार्यक्रमास ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु जग्गी वासुदेव, वन विभागाचे सचिव विकास खारगे, सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वन संरक्षक अनुराग चौधरी यांच्यासह ईशा फाऊंडेशनचे सदस्य तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.
 
 
कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रातील कार्यात अधिकाधिक महिलांच्या सहभागित्वाची आवश्यकता व्यक्त करून सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात अल्पभूधारकांची संख्या अधिक असून त्याचे प्रमाण सरासरी १.४४ हेक्टर इतके आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आधुनिक शेती करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढणार आहे.
 
 
सिंचन, उर्जा, शेत रस्ते, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी तंत्रज्ञान, विपणन, समुह शेती, कृषी पतपुरवठा याकडे अधिक लक्ष देण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. राज्यात मोठ्याप्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गट स्थापन करण्यात येत आहेत. ईशा फाऊंडेशनने आपल्या कार्यक्रम नियेाजनात सेंद्रीय शेती, वैरण लागवड, आणि मातीचा पोत (मृदा आरोग्य) यासारख्या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत करावे. यवतमाळ जिल्ह्यासाठी ईशा फाऊंडेशन करत असलेल्या डीपीआर मध्ये लोकसंख्या शास्त्र आणि मातीचे आरोग्य या बाबींचा विचार करतांना प्रकल्पात सहभागी प्रत्येक सहभागीदाराचे दायित्व निश्चित केले जावे, असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@