विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘स्काउट गाईड शिबीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘स्काउट गाईड शिबीर
 
जळगाव, ५ मार्च
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतेच स्काउट गाईड शिबीर झाले. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, समन्वयक गणेश लोखंडे यांच्या हस्ते झाले.
 
या शिबिराचा उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये लपलेल्या कलागुणांना वाव देणे, तसेच नवयुवकांचा शारीरीक, मानसिक, बौद्धिक तसेच सामाजिक विकास करवून घेणे हा असतो. शिबिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. दुसर्‍या दिवसाची गणेश वंडोळे यांनी योगासनाचे महत्त्वही सांगितले.
विद्यार्थ्यांची खाद्यपदार्थ बनविण्याची स्पर्धा झाली. परीक्षक म्हणून मिनाक्षी महाजन, वृषाली खुर्गे, भूषण खैरनार व कांचन विसपुते यांनी काम पहिले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मुकुंद शिरसाठ व हर्षदा उपसनी यांनी पाहिले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@