सहकार सुगंध’ तर्फे आयोजित वार्षिक अहवाल स्पर्धेतजळगाव जनता सह.बँकेला प्रथम पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 
सहकार सुगंध’ तर्फे आयोजित वार्षिक अहवाल स्पर्धेत
जळगाव जनता सह.बँकेला प्रथम पुरस्कार
जळगाव, ५ मार्च
महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला बळकटी आणणार्‍या सहकारी बँकांना त्यांच्या कार्यात प्रोत्साहन मिळावे या हेतूने ‘सहकार भारती’ या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचे मुखपत्र असलेल्या ‘सहकार सुगंध’ मासिकाच्यावतीने राज्यातील सहकारी बँकांसाठी ‘प्रतिबिंब’ वार्षिक अहवाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात २०१६-१७ या वर्षासाठी उत्तर महाराष्ट्रातून जळगाव जनता सहकारी बँकेच्या अहवालास प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.
 
 
राज्याचे सहकार राज्यमंत्री सुभाष देशमुख तसेच सहकार परिषदेचे अध्यक्ष तसेच राज्य मंत्री शेखरजी चरेगावकर यांच्या हस्ते सोलापूर येथे ३ मार्च रोजी हुतात्मा स्मृती मंदिर, येथे सादर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. बँकेचे संचालक बन्सीलाल अन्दोरे, आणि अधिकारी दिनेश मडके यांनी बँकेच्यावतीने पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी व्यासपीठावर ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय महामंत्री डॉ.उदयराव जोशी, राज्य बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आदी मान्यवर होते.
 
जळगाव जनता सहकारी बँकेच्या अतिशय आकर्षक स्वरूपातील वार्षिक अहवालावर उत्तुंग भरारी घेण्यार्‍या विमानाचे चित्र असून ‘गगन भरारी सहकाराची, प्रगतीची अन विश्वासाची’ असे अतिशय समर्पक शीर्षक आहे.बँकेची आर्थिक स्थिती आणि प्रगतीचा संचालक मंडळाचा अहवाल मराठी आणि इंग्रजी भाषेत दिला आहे.त्याचप्रमाणे सभासदांसाठी उपयुक्त माहितीही अहवालात देण्यात आली.
 
@@AUTHORINFO_V1@@