एक पुतळाच तर पाडलाय ना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |


 
 
 
लेनिनचा पुतळा पाडल्यानेअच्छे दिनयेतील का? असा सवाल माध्यमातून उपस्थित केला जात आहे. इतरांना प्रश्न विचारणार्‍यांनी दोन प्रश्नांची उत्तरे द्यावी. गेल्या वर्षभरात संघ भाजप कार्यकर्त्यांच्या नृशंस हत्या झाल्या त्यावेळी तुम्ही पुतळा होऊन का बसला होता? आणि आज लेनिनची हुकूमशाही राजवट असती तर तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार तरी मिळाला असता का?
 

त्रिपुरामध्ये ३५ वर्षांची कम्युनिस्ट राजवट दणदणीत संख्याबळाने हद्दपार झाल्यानंतर तिथे लहानमोठ्या घटना घडायला सुरुवात झाली आहे. कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी इतकी वर्षे सत्तेच्या आधारावर केलेल्या दादागिरीला आत चाप लागला आहे. हा मुद्दा केवळ चाप लागण्याचा नाही, तर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना लोकांनी चोप देण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. यातल्या कुठल्याही हिंसक घटनांचे समर्थन करता येणार नाही. तो करण्याचा या अग्रलेखाचा उद्देशही नाही. मात्र, जणू काही लेनिन हा आपलाराष्ट्रपुरुषअसल्याच्या आर्विभावात जी काही उरबडवेगिरी सुरू झाली आहे ती उबग आणणारी आहे. लेनिनचा पुतळा पाडण्याची कृती अत्यंत उत्स्फूर्त होती. तो काही ठरवून केलेला कट वगैरे नव्हे. सुनील देवधर आणि चमूने त्रिपुरात मिळवलेला विजय आजही माध्यमविश्वातल्या अनेकांना पचविता आलेला नाही. डाव्यांच्या या पराभवाचे दु: कुठे मोकळे करायचे हा मोठाच प्रश्न आहे. पुतळा पाडल्याचे दु: कोणी कसे व्यक्त करायचे, हा आता वेगळ्याच चिंतेचा भाग झाला आहे. मुक्त माध्यमातल्या भाकडांना त्यामुळे रडारड करायची संधी मिळाली आहे आणि त्यात काही बिनडोकही सामील झाले आहेत. सुसंस्कृत असणे म्हणजे काय, याचे भाजप संघासाठी मोफत क्लासेस सध्या सुरू झाले आहे. हे मोफतचाटेक्लासेस कोणासाठी आहेत, हे माहीत नाही. मात्र, ते फुकट देण्याचे उद्योग मात्र जोरात आहेत.

 
 
पुतळा पाडणारे भाजपचे होते का संघाचे होते? याबाबत कुठलीही सुस्पष्टता नाही. मात्र, दोषारोप सुरू झाले आहेत. लेनिनचा पुतळा पाडल्यानेअच्छे दिनयेत येतील का? असा एक शोदेखील कुणा दळणकांडण काढणार्‍या वाहिनीने चालविला. माध्यमांचा असा प्रश्न विचारायचा अधिकार मान्य केलाच पाहिजे. मात्र, खुद्द लेनिन असता तर त्याच्या राजवटीत असा सवाल करता आला असता का? हा प्रश्न माध्यमांना विचारला पाहिजे. याहून गंभीर प्रश्न म्हणजे लेनिनचा पुतळा पाडल्यावर शोकाकुल झालेले संघ आणि भाजपच्या १२ कार्यकर्त्यांच्या निर्घृण हत्या झाल्या तेव्हा पुतळा होऊन का बसले होते? त्यांच्या बातम्या दाखविण्यापासून त्यांना कोणी रोखले होते? कुठल्याही डाव्या विचारवंतांच्या हत्या झाल्या की महिनोन्महिने सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणारे यावेळी कुठे होते? डाव्या कार्यकर्त्यांच्या हत्यांविषयी एल्गार आणि संघ- भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या की ते बेवारस, हा उफराटा न्याय या मंडळींना कुणी शिकविला?
 
 
 
लेनिनचा पुतळा पाडला तर त्यात एवढा गहजब माजविण्याचे कारण ते काय? जिथे जिथे लेनिनचे पुतळे उभे केले होते तिथे तिथे ते पाडले गेले आहेत. किंबहुना, लेनिनचे पुतळे पाडण्याची टूमच निघाली होती. भारतात ती थोडी उशिराच पोहोचली असे म्हणावे लागेल. झारशाही संपविण्याकरिता लेनिनने जे केले त्याचे लोकशाही व्यवस्था स्वीकारलेल्या देशात समर्थन होऊच शकत नाही. त्याचे पुतळेही उभारले जाऊ शकत नाहीत. लेनिनने झारला वेढा घातला. झारच्या बाजूने बोलणार्‍या व्यक्तीची मुस्कटदाबी केली. पळून जाणार्‍या त्याच्या पत्नीला मारले. त्याची रसद तोडली. इतकेच नाही तर झारची हत्या घडवून आणण्यामागे लेनिनचाच हात होता. इतके करूनही ज्या विचारसरणीची राज्यव्यवस्था लेनिनने आणली तिचा परिणाम म्हणूनच अखेर रशियाची शकले उडाली. त्याने आणलेल्या राज्यपद्धतीतील बंधने, त्याचा अवलंब करण्यासाठी सहन करावा लागणारा जाच यामुळेच लोकांनी ठिकठिकाणी चिडून लेनिनचे पुतळे उद्ध्वस्त केले. अर्मेनियातून १९९१ साली लेनिनचा पुतळा हटवला गेला, अझरबैजानमधील बाकू येथून १९९० साली लेनीनचा पुतळा हलविला गेला. ताजिकिस्तानमधून लेनिनचा पुतळा हटवून स्थानिक नेत्यांचे पुतळे बसविले गेले. बल्गेरिया, झेक, जॉर्जिया, हंगेरी, लॅटव्हिया, पोलंड येथील जनतेने तिथले पुतळे हटविले. युक्रेनमधील तर लेनिनचे ५०० पुतळे लोकांनी काढले आहेत. २०१५ साली युक्रेनच्या अध्यक्षांनी विशेष कायदा करून हे पुतळे हटविले. यामागचे मुख्य कारण म्हणजे साम्यवादी विचारसरणी. ही हुकूमशाहीचेच प्रतीक आहे.
 
 

पाश्चात्त्य माध्यमांच्या उष्ट्यावर जगणारे आपल्याकडचे काही लोक सध्याच्या राजकारण्यांनाहुकूमशहाम्हणतात, तेव्हा हुकूमशाहांनी अशा विचारवंतांचे काय हाल केले होते याची त्यांना जराही कल्पना नसते. जे जगाने नाकारले ते आपण स्वीकारायचे आणि पुन्हा विचारवंत म्हणून मान्यताही मिळवायची, हे केवळ आणि केवळ भारतातच होऊ शकते. जगातील इतक्या ठिकाणी लेनिनचे पुतळे काढले गेले आहेत. साधी बातमी देण्याव्यतिरिक्त त्यांनी कुठल्याही प्रकारचे निषेध नोंदविलेले नाहीत. आजही लेनिनचे पुतळे उखडण्याचे काम अनेक ठिकाणी सुरूच आहे. सगळीकडे लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणूनच याकडे पाहिले जाते. पुतळा पाडणार्‍यांचे नाव-गाव विचारून आताअच्छे दिनयेणार का? असा प्रश्न फक्त आणि फक्त आपल्याकडेच विचारला जाऊ शकतो. जेव्हा लेनिनचा पुतळा उभा होता तेव्हा त्रिपुरालाअच्छे दिनआले होते का? त्रिपुराच्या करबुक विधानसभेतून नुकत्याच निवडून आलेल्या बर्बुमोहन नावाच्या नवोदित आमदाराकडे स्वत:चे घर नाही. मार्क्सवादी पक्षाच्या एका बाहुबली आमदाराला हरवून ते निवडून आले आहेत. या शेतकर्‍याला लेनिनचा पुतळा चौकात उभा असताना त्रिपुराच्या राजकारणात काय स्थान होते?

@@AUTHORINFO_V1@@