महिलांच्या आरोग्याची सप्ताहभर होणार मोफत तपासणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |

तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग, भाजप वैद्यकीय आघाडीचा उपक्रम 

जळगाव :
भाजप जिल्हा महानगर व वैद्यकीय आघाडीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ८ ते १५ मार्चपर्यंत मोफत आरोग्य तपासणी सप्ताह राबविण्यात येणार आहे. यात शहरातील ३० नामांकित तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी होणार असल्याचे वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले.
 
 
या अभियानात सहभागी डॉक्टरांच्या रुग्णालयात गरजू महिलांची वेगवेगळ्या आजारांवर अत्याधुनिक मशिनींद्वारे मोफत तपासणी केली जाणार आहे. मोठ्या शस्त्रक्रिया व उपचारासाठी आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच ना.गिरीश महाजन व आ. सुरेश भोळे यांच्याकडून वैद्यकीय मदतीसाठी शिफारस केली जाईल. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आरोग्य तपासणी फॉर्म आ. सुरेश भोळे यांचे संपर्क कार्यालय : ६, ७ नूतन मराठा कॉम्प्लेक्स, स्टेडियम जवळ, जळगाव येथे भरून द्यायचे आहेत. अधिक माहितीसाठी ०२५७-२२४२६२६, ०२५७-२२४२७२७ यावर संपर्क साधावा.
 
 
सहभागी डॉक्टर
नेत्ररोग तज्ज्ञ - डॉ धर्मेंद्र पाटील, डॉ. पंकज शाह, डॉ. दर्शना शाह, डॉ. प्रवीण पाटील, स्त्री रोग तज्ज्ञ : डॉ. विलास भोळे, डॉ. जयंती चौधरी, डॉ. अंजली भिरुड, डॉ. हेमांगी कोल्हे, डॉ. ज्योती काळे, डॉ. अंजली पाटील, प्लास्टिक सर्जन : डॉ. शिरीष चौधरी, डॉ. श्रीराज महाजन, दंतरोग तज्ज्ञ : डॉ. राहुल पाटील, डॉ. मनिष चौधरी, त्वचा रोग तज्ज्ञ : डॉ. रती महाजन, डॉ. सुभा महाजन, फिजिशियन : डॉ मनोज टोके, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. पल्लवी राणे, बालरोग तज्ज्ञ : डॉ सुरेंद्र पाटील, डॉ. वृषाली सरोदे, पेडियाट्रिक : डॉ वरूण सरोदे, नुरो फिजिशियन : डॉ तेजेंद्र चौधरी, युरोलॉजिस्ट : डॉ. राहुल चिरमाडे, अस्थिरोग तज्ज्ञ : डॉ. नितीन धांडे, पोटविकार तज्ज्ञ : डॉ ऋषिकेश चौधरी, जनरल प्रॅक्टिशनर्स : डॉ. धनराज चौधरी, डॉ. विरेन खडके, डॉ. महेंद्र पाटील, डॉ. विनित नाईक, डॉ. राजेश वालडे यांचा समावेश आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@