मार्चअखेरीस बोगद्यातून वाहतूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 
जळगाव, ६ मार्च :
गणेश कॉलनीत बजरंग बोगद्याच्या शेजारी बांधण्यात आलेला नवीन बोगदा मार्च अखेरीस वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. त्यापूर्वी पोल शिफ्टिंग, रस्ता जोडणे आणि गटारीचे बांधकाम आदी कामे मात्र, वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत.
 
 
वाहतुकीच्या सोयीसाठी बजरंग बोगद्याच्या शेजारी आणखी एक नवीन बोगदा बांधण्यात आला आहे. त्याला रेल्वे रुळांच्या खाली ढकलण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, आता हा बोगदा मार्चअखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे आव्हानात्मक काम उरले आहे.
 
 
या बोगद्याला मुख्य रस्ता जोडावा लागणार आहे. त्याच्या समोर रेल्वेच्या हद्दीत वीज वाहिनीचे खांब उभे आहेत. ते दुसरीकडे स्थलांतरित करावे लागतील. रेल्वेने पत्र दिल्यानंतर महावितरणला हे काम करावे लागेल. पण महापालिकेचे कुठलेही काम म्हटले की, महावितरण थकबाकीची कारणे पुढे करते हा गेल्या काही महिन्यातील प्रशासनाचा अनुभव आहे.
 
 
मंदिराच्या आवारातून रस्ता
बोगद्यासाठी जोडरस्ता तयार करताना नवसाचा गणपती मंदिराच्या आवारातील काही जागा वापरावी लागणार आहे. ही जागा निमुळती असून, याबाबत मंदिराच्या ट्रस्टींशी मनपाचे बोलणे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे मंदिर मनपाच्या जागेत उभे आहे. यामुळे काही अडचण येणार नाही. रस्त्यासाठी हवी असलेली जागा एका कोपर्‍यात आहे. ही सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण झाली तर मार्च अखेरील बोगद्यातून वाहतूक सुरू होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@