पालिका रुग्णालये व विभाग कार्यालयात डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसवणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 

 
 
 
मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात, रुग्णालये आणि विभाग कार्यालयात डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसविण्यात येणार आहे. ८८ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टरसाठी पालिका ३ कोटी ६१ लाख ७१ हजार ८७२ रुपये खर्च करणार आहे.
 
यासाठी मे. समर्थ सिक्युरिटी सिस्टीम इंडिया प्रा. लि. आणि मे. रिलायन्स इलेट्रॉनिक्स अशा दोन निविदा आल्या होत्या. त्यामधून मे. समर्थ सिक्युरिटी सिस्टीम इंडिया प्रा. लि. या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत येणार आहे.
 
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ साली दहशतवादी हल्ला झाला होता. १० दहशतवाद्यांनी मुंबईतील विविध ठिकाणी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर २००९ मध्ये ३७ ठिकाणी ४६ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर व २०१० साली १२ ठिकाणी १५ डिटेक्टर बसविण्यात आले होते. या डिटेक्टरला सात वर्ष झाले आहेत. हे सर्व ठिकाणचे डिटेक्टर सध्या बंद आहेत. मुंबई शहरास असलेला दहशतवाद्यांचा धोका लक्षात घेता सुरक्षा उपकरणे सुस्थितीत असणे आवश्यक आहे. त्यानुसार पालिका मुख्यालय, विविध रुग्णालये व विभाग कार्यालये या ठिकाणी डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसविण्यात येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@