क्रेडाईच्या अध्यक्षपदी पुन्हा सुनील कोतवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 
 

नाशिक : बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई नाशिकचे अध्यक्षपदबांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई नाशिकचे अध्यक्षपद सलग दुसर्‍यांदा सुनील कोतवाल यांच्याकडे आले असून, या पदाचे दावेदार असलेले दुसरे उमेदवार अभय तातेड यांनी कोतवाल यांचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
 
दोन वर्षात केलेल्या कामांचा विचार करून आणि पुढील कामांसाठी साथ देण्याचे आवाहन कोतवाल यांनी तातेड यांना केले. त्याला तातेड यांनी सकारात्मकता दर्शवित आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कोतवाल यांची निवड निश्चित झाली आहे. शनिवारीच उपाध्यक्षपदासाठी उदय घुगे आणि उमेश वानखेडे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून या निवडीची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.
 
शहरात तीनशे बांधकाम व्यावसायिक सभासद असलेल्या क्रेडाईचे शहर विकासातील योगदान कायमच मोठे राहिले आहे. या संघटनेची दर दोन वर्षांनी पदाधिकार्‍यांची निवड होते. मात्र आजपर्यंत कधीही मतदान झालेले नाही. यंदा मात्र विद्यमान कार्यकारिणीने थेट सभासदांतूनच मतदान करून निवडीचा मार्ग पत्करला होता, असे सांगितले जात होते परंतु, आतापर्यंत एकमेकांशी होत असलेल्या
 
चर्चेतून संघटनेच्या कामाला, हिताला प्राधान्य देण्याचा प्रयत्न दिसून येतो आहे. कार्यकारिणी सदस्यांच्या सात पदांसाठीही आलेल्या अर्जातून दोन अर्ज मागे घेण्यात आलेले असून माघारीची अंतिम मुदत ७ मार्चपर्यंत आहे. तोपर्यंत चर्चेतून अविरोध निवडीचा मार्ग प्रशस्त केला जाणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. तरीही निवडणूक होणार की नाही, याबाबत ७ मार्चलाच अंतिम निर्णय होऊ शकणार आहे.
 
 
संघटनेचा विचार करूनच सहकार्य
 
सुनील कोतवाल आणि अनंत राजेगावकर माझ्याकडे आले. त्यांनी सविस्तर चर्चा केली. अनेक कामे कोतवालांनी केली, आणखी काही करायची आहेत, असे आवाहन त्यांनी केल्याने मी सहकार्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत निवडणूक झालेली नाही. चुकीचा पायंडा पडू नये म्हणून अर्ज मागे घेतला.
- अभय तातेड,
 
 
 
संघटनेला प्राधान्य देत तातेडांची साथ
आम्ही अभय तातेड यांची भेट घेतली. त्यांचे-माझे संबंध भावा-भावासारखे आहेत. आम्ही अनेक वर्षे सोबत कामही केलेले आहे. माझ्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या कामांची तसेच पुढे करावयाच्या कामांची माहिती मी दिली. त्यांनीही मोठ्या मनाने संघटनेला प्राधान्य देत अर्ज मागे घेतला.
- सुनील कोतवाल, अध्यक्षपदाचे उमेदवार
 
@@AUTHORINFO_V1@@