चाळीसगाव बसस्थानकातून शिवशाही बस सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 

आ. उन्मेष पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी, प्रवाशांची गैरसोय टळली

 
 
चाळीसगाव :
येथील बसस्थानकासाठी एक कोटी रुपये नूतनीकरण कामामुळे आधीच बसस्थानकाच्या चेहरा मोहरा बदलला असून प्रवासी वाहतूक व्यवस्था अधिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यातच आरामदायी नवीन शिवशाही दोन बसेस दाखल झाल्या आहेत.
 
रविवारी रात्री उशिरा या गाड्यांना पुणे येथे रवाना करण्यात आले. आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, जि.प.शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, विभागीय वाहतूक अधीक्षक विजय धायडे, आगारप्रमुख संदीप निकम, तालुका अध्यक्ष के.बी.साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या बसेसमुळे विदयार्थी, ज्येष्ठ नागरिक सर्वसामान्य प्रवाशांची व्यवस्था होणार असून या दोन नवीन बसेसमुळे आगाराचे उत्पन्न वाढणार आहे.
 
 
शिवशाही बसचे पूजन करुन आमदार उन्मेष पाटील यांनी मनोगतात सांगितले की, बसस्थानकाच्या दुरावस्थेमुळे मी स्वतः हतबल होतो. प्रवाशी जनतेची या अडचणीतून सुटका व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेतली. प्रसंगी विधानसभेच्या पायरीवर उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निधी मंजूर करून घेतला. यामुळे तालुक्यातील १३६ गावांचा दळणवळणाचा मोठा भार असलेल्या बसस्थानकाने नवे रूप धारण केले आहे. नवीन सोयी सुविधेचा पहिला टप्पा गाठला आहे याचा सर्वच प्रवाशांसह कर्मचार्‍याबरोबर मला देखील आनंद आहे. यानिमिताने एक पाऊल पुढे टाकत वचनपूर्ती होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी उपसभापती संजय पाटील, पं.स. सदस्य दिनेश बोरसे, प्रभाकर चौधरी, सुनील निकम, राजेंद्र पगार यांच्यासह महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@