पतंगराव कदम अतिदक्षता विभागात दाखल, प्रकृती ढासळली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |

 
 
 
मुंबई :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्या नंतर त्यांच्या प्रकृतीविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती. मात्र त्यांना आता अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती ढासळली असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
त्यावेळी देखील त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.ते मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना त्वरित अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
पतंगराव कदम यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पतंगराव कदम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून माजी मंत्री देखील आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे तसेच आता अतिदक्षता विभागात हलवण्यात आल्यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@