कळमडूला बेरोजगारांची सैन्यातील बोगस भरती प्रकरणाचा गुंता वाढला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 

मुख्य आरोपीच्या शोधात पोलीस, अटकेतील दोघांना पोलीस कोठडी

चाळीसगाव:
तालुक्यातील कळमडू येथील चार तरुण बेरोजगारांना बोगस भरती व बनावट नियुक्तीपत्र देऊन लाखोंनी गंडा घालणार्‍या संजय अडकमोलचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून सोमवारी या घटनेतील आरोपी कैलास सोनवणे व सुधीर कैलास सोनवणे यांना कोर्टात हजर केले होते. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, कळमडूच्या चार तरुण बेरोजगार अनुक्रमे दीपक केदार ,सोमेश गायकवाड, प्रकाश पाटील, समाधान केदार यांनी संबंधित टोळीचा मध्यस्थ असलेल्या सुधीर सोनवणे, रा. कळमडू ता चाळीसगाव या तरुणाने संबंधित पालक व तरुणांना नोकरी लावून देण्यासाठी अनेकांकडून पैसे घेतले होते. मात्र ना नोकरी दिली, ना पैसे परत दिले. त्यामुळे त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@