सशक्त भारतासाठी सशक्त भाजप करणे गरजेचे : रवींद्र चव्हाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
रायगड : ‘‘सशक्त भारतासाठी सशक्त भाजप करणे गरजेचे आहे, भाजप लोकहिताचे धोरण असलेला पक्ष असून त्या धारणेने सर्वत्र कामे चालू आहेत. भाजप सरकारने पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून गावातील रस्ता हा शहराला जोडण्यासाठीमहत्त्वपूर्ण कामे हाती घेतली आहेत’’, असे राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
 
रायगड जिल्ह्यातील तालुका तळा येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर झालेल्या कामांच्या उद्घाटन व भूमिपूजन समारंभासाठी आले असताना ते बोलत होते. यावेळी तळा तालुक्यात ग्रामस्थ तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
 
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेला मौजे सोनसडे येथील ११ रस्त्यांचे भूमिपूजन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा नियोजन विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या बोरघर येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बोरघर हवेली फाटा ते भानंग रस्त्याचे, मालाढे येथील स्मशानभूमी रस्त्याचे, गिरणे येथील संरक्षक भिंत व अंतर्गत रस्त्याच्या कामांचे, चरई खुर्द गौळवाडी भानंग कोंड ते उसर रस्ता यांचेदेखील भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्यासाठी १४५. ७८ लक्ष रुपये मंजूर झाले असून हा रस्ता ३.५ किमी डांबरीकरणाअंतर्गत होणार आहे. यासाठी ५ वर्ष देखभाल दुरुस्तीची रक्कम १४.१६ लक्ष रुपये आहे.
 
यावेळी तालुकाप्रमुख कैलास पायगुडे यांच्या पक्षविस्तारासाठी करण्यात येणार्‍या कामाचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी आ. प्रशांत ठाकूर यांनी सरकारच्या विकासकामांची माहिती दिली. याप्रसंगी रायगड जिल्हा प. अध्यक्षा आदिती तटकरे, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, जि. प. सदस्या गीता जाधव यांसह अनेक मान्यवर तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@