जिल्हा बँकेची जिल्ह्यात विविध ठिकाणी वसुली मोहीम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा नाना आहेर यांनी मालेगाव तालुक्याचा वसुली आढावा घेतला. ते म्हणाले की, मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणार थकबाकी राहिलेली आहे. ही शोकांतिका आहे. आज आपली बँक अडचणीत असताना संस्थापकांचा तालुका मागे का? आपण सर्वांनी प्रयत्न करून मार्चअखेर १०० टक्के वसुली करावी, अन्यथा आपणावर कठोर कारवाई करण्यात येईल. बँक टिकली तर तुम्ही टिकाल, असा इशारा दिला आहे.
 
मालेगाव तालुक्यात ७६ कोटी ५६ लाख वसूल झालेले आहेत. बँकेचे २८३७ सभासद पात्र असून त्यापैकी ९३० सभासदांनी त्यात भाग घेतला आहे. मालेगाव तालुक्यात मोठी थकबाकी असून तालुक्यातील ज्या कर्मचारी वर्गाने कर्जवाटप केले. त्या कर्मचार्‍यांनी १५ मार्चअखेर समाधानकारक वसुली केली नाही तर संबंधितांची बदली तालुक्याबाहेर करण्यात येईल, तसेच जर ते कर्मचारी- सेवक या वर्षात निवृत्त होणार असतील तर त्यांना निवृत्तीनंतरच्या रकमा देण्यात येऊ नये असेही सूचित करण्यात आले आहे.
 
 
संदीप सोनजे औद्योगिक संस्थेवर सरपेसी अंतर्गत कारवाई केली असून सदर संस्थेच्या लिलावाच्या प्रक्रियेसाठी दुसरी जाहिरात देण्यासाठी निर्देश दिले आहेत. तसेच रेणुकादेवी सूतगिरणीची ही जाहिरात राज्यस्तरावर देत आहोत, असे त्यांनी सांगितले. वाहन कर्जाचे १३३ सभासद थकबाकीदार असून १० ट्रॅक्टर जप्त केलेले असून सदर ट्रॅक्टर्सची लिलावाची प्रक्रिया १५ मार्चअखेर करावी. उर्वरित सभासदांकडून रक्कम वसूल करावी अन्यथा ट्रॅक्टर जप्त करावे. ट्रॅक्टर जागेवर नसल्यास सभासदावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. असेही यावेळी सांगण्यात आले. पोल्ट्री कर्जाचा आढावा घेतला असता, ज्या सभासदांनी पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज घेतले आणि फेडले नाही. पण त्यांचा तो व्यवसाय सुरू आहे. त्या सभासदांच्या मालमत्तेचे लिलाव करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
 
दिंडोरी तालुक्यात कर्जवसुली
 
दिंडोरी तालुक्यात झालेल्या कर्जवसुली बैठकीनुसार अध्यक्ष केदा नाना आहेर यांच्या आदेशानुसार दिंडोरी तालुक्यात वसुली मदतीकरिता आज सुट्टीच्या दिवशी प्रधान कार्यालयातील सर्व सेवक दिंडोरी तालुक्यात वसुलीसाठी रवाना.
 
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरिता थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. अधिकारी व कर्मचारीवर्गाच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार बँकेच्या सर्व कर्मचार्‍यांनी स्वतःला या मोहिमेत सर्वथाने सहभाग करून घेतले आहे. त्यानुसार बँकेच्या प्रधान कार्यालयातून कर्जवसुलीची सूत्रे वेगाने हलू लागली आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@