गीतांजली समूहाच्या उपाध्यक्ष चितालीया याला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |


मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी गीतांजली उद्योग समूहाच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या विपुल चितालिया याला आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. चितालिया हा गीतांजली समूहाचे सर्व बँक व्यवहार सांभाळतो तसेच मेहुल चोकसी याचा अत्यंत निकटवर्ती समजला जातो.

आज सकाळीच मुंबई विमानतळावरून चितालियाला अटक करण्यात आली. चितालिया आज सकाळी मुंबई विमानतळावरून येणार असल्याची माहिती सीबीआय मिळावी. त्यानुसार आज सकाळीच सीबीआयने विमानतळावर जाऊन त्याला ताब्यात घेतले. तसेच पीएनबी घोटाळ्याच्या पुढील चौकशी करण्यासाठी त्याला घेऊन जाण्यात आले आहे.

याच बरोबर गीतांजली ग्रुपला कर्ज मंजूर केल्याबद्दल आयसीआयसीआय बँक अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. गीतांजली ग्रुपला कर्ज दिल्याबद्दल आयसीआयसीआय बँकच्या अधिकारी चंदा कोच्चर यांना देखील गंभीर फसवणूक तपासणी कार्यालयकडून (एसएफआयओ) आज नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून संसदेमध्ये देखील या घोटाळ्याचे पडसाद उठत आहेत. या घोटाळ्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे काल दिवसभरासाठी संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. तसेच आज देखील विरोधकांकडून संसद परिसरात सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@