वाघूर’मध्ये ५४.७५ टक्के पाणीसाठा !टंचाईची ‘नो चिंता’; आजपासून पाणीपुरवठा सुरळीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 
वाघूर’मध्ये ५४.७५ टक्के पाणीसाठा !
टंचाईची ‘नो चिंता’; आजपासून पाणीपुरवठा सुरळीत
 
जळगाव, ५ मार्च
 
वाघूर धरणात २१२.८३० दशलक्ष घनमीटर (दलघमी) अर्थात ५४.७५ टक्के पाणीसाठा उन्हाळ्यात उपलब्ध आहे. त्यात १३१.००० दलघमी जिवंत पाणीसाठा असल्याने जळगावकरांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही, अशी स्थिती आहे.
 
 
दरम्यान, गळती लागलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून मंगळवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार होणार असून नियोजित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. जळगाव शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सुमारे पाच लाख लोकसंख्या असलेल्या शहरासाठी वाघूर धरणातून वर्षाला ४० दलघमी पाणीपुरवठ्याची मागणी असते. वाघूर धरणाची पाणीसाठवण क्षमता ही ३२५ दशलक्ष घनमीटर असून, सध्या वाघूर धरणात २१२.८३० दलघमी अर्थात ५४.५० टक्के पाणीसाठा आहे. पाण्याची पातळी ही २३०.४५० मीटरची आहे. धरणात आजमितीस जिवंत पाणीसाठा १३१.००० दलघमी इतका आहे. त्यामुळे जळगाव शहराला किमान दीड ते दोन वर्ष पुरू शकेल, एवढा पाणीसाठा धरणात उपलब्ध असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्‍नाला सामोरे जावे लागणार नाही.
जलवाहिनीची २७ तासांनंतर दुरुस्ती
वाघूर पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकलेल्या १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला चिंचोली गावाजवळील पुलाजवळ, कुसुंबा गो-शाळेजवळ गळती लागली होती. तसेच रॉ-वॉटर पंपिंगमध्ये ५०० एचपीच्या पंपातही बिघाड झाला होता. दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा एक दिवसासाठी खंडित केला होता. जलवाहिनी व पंप दुरुस्तीसाठी सुमारे २७ तासांचा अवधी लागला. दुरुस्तीनंतर सोमवारी सायंकाळी जलकुंभ भरण्याचे काम पाणी पुरवठा विभागातर्फे हाती घेण्यात आले. त्यामुळे उद्या (दि. ६) नियोजित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@