जळगाव, भुसावळहून आजपासून औरंगाबादसाठी धावणार शिवशाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 
 
जळगाव, भुसावळहून आजपासून औरंगाबादसाठी धावणार शिवशाही
जळगाव-
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणलेल्या शिवशाही बसेस आता सोमवारपासून
(५ मार्च) औरंगाबाद मार्गावरही धावणार आहेत. पुण्यापाठोपाठ आता औरंगाबादला शिवशाही बसने जाता येणार आहे. जळगाव आणि भुसावळ आगारातून शिवशाही बसेस धावणार आहेत. महामंडळाच्या स्वमालकीच्या सहा बसेस असल्याने प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने लांबचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, या हेतूने खासगी ट्रॅव्हल्स कंपनीशी करार करून भाडेतत्त्वावर शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली.
 
 
ही शिवशाही बस लांब पल्ल्याच्या मार्गावर सुरू करण्यात आली.
जळगाव विभागात जळगाव आगारातून जळगाव ते पुणे या मार्गावर जानेवारी महिन्यात शिवशाही बससेवा सुरू झाली. रोज सायंकाळी साडेसातला पुण्यासाठी बस सोडण्यात येत आहे.आता पुण्यापाठोपाठ औरंगाबाद मार्गावरही शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली आहे. परिवहन महामंडळाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या शिवशाही बसवरील चालक खासगी आणि वाहक महामंडळाचा कर्मचारी आहे.जळगाव-पुणे मार्गावर या बस सुरू आहेत. आता जळगाव विभागास महामंडळाच्या सहा बसेस प्राप्त झाल्याने त्यावरील चालक व वाहक हे दोन्ही कर्मचारी एस.टी. महामंडळाचे असणार आहेत. जळगाव व भुसावळ आगारातून या बस धावणार आहेत. भुसावळ येथून सुटणारी बस ही जामनेरमार्गे असणार आहे.
 
 
जळगाव, भुसावळहून दररोज तीन फेर्‍या
औरंगाबादसाठी जळगाव व भुसावळ आगारातून दररोज प्रत्येकी तीन फेर्‍या असणार आहेत. जळगाव-औरंगाबाद बस दररोज सकाळी ५.१५, ७.१५ आणि ९ वाजता सुटेल. या बसचे भाडे २७३ रुपये प्रतिसीट असेल. तर भुसावळ-औरंगाबाद (जामनेरमार्गे) बस दररोज सकाळी ५.३०, ६.४५ आणि ७.४५ वाजता सुटेल. या बसचे भाडे २८३ रुपये प्रतिसीट असणार आहे, अशी माहिती एस.टी. महामंडळाकडून
देण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@