मुस्लीम महिला अधिवेशनात विविध ठरावांना संमती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 
 
  
मुस्लीम महिला अधिवेशनात विविध ठरावांना संमती
जळगाव, ४ मार्च
कुल जमाती कौन्सिल जळगावतर्फे तहफ्फुज शरियत या विषयावर रविवार ४ रोजी सालार नगर येथे दुपारी १ ते ४ या वेळेत अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
 
मुस्लीम महिलांनी आपल्या अधिवेशनात सुमारे ७ हजार महिलांच्या साक्षीने सरकारने आणलेल्या तीन तलाक बिलाचा निषेध व्यक्त करीत ते बिल मागे घ्यावे, शरीअत ए-इस्लामीमध्ये हस्तक्षेप करु नये, मुस्लीम समाजानेसुद्धा शरीअतचे पूर्णपणे पालन करावे असे विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठनाने करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुंबई येथील ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल बोर्डच्या सदस्या मानेसे बुशरा
आबेदी होत्या.
 
वक्ते शबाना आएमी (वहदत ए-इस्लामी हिंद औरंगाबाद) अशरफुन्निसा मुफ्ती अफजल (तबलिग जमात) नसरीन शेख महेमूद (जमाते इस्लामी) हे होते.
प्रमुख पाहुण्या खुशी बानो अब्दुल गफ्फार मलिक, हाजरा बी फारुख शेख, शकिला बी इकबाल शेख, नर्गिस बानो शेख साजिद, जुबेदा बी सैय्यद चॉंद, शफिका बी. अमुफ्ति अतिकर्ररमिन, आएशा आरीफ देशमुख, (जी आय ओ) रशिदा आपा (मुस्लीम महिला मदरसा, शाहू नगर) नुसरत बाजी (मुस्लीम महिला मदरसा, मेहरूण) आदी उपस्थित होत्या.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लोकसभेत पारित करण्यात आलेले तिहेरी तलाक बिल हे इस्लामविरोधी आहे, असे प्रमुख वक्त्यांनी सांगितले.
 
मंजूर झालेले ठराव
मुस्लीम महिलांचा हा भव्य तहफ्फुज शरीयत बचार अधिवेशन तीन तलाक बाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय लोकसभेत पारीत करण्यात आलेल्या बील इस्लाम विरोधी आहे, तीन तलाक बिल शासनाने त्वरीत रद्द करावे, आपापसातील तंटे, भांडणे शरीअत-ए- इस्लामीच्या नियमानुसार सोडवावे, आपल्या पंथ, जमात, संस्था या सर्वांपेक्षा एक संघ होण्याचा प्रण घ्यावा यासह विविध ठराव पारीत करण्यात आले.
 
@@AUTHORINFO_V1@@