कृषी सहाय्यक लाच स्वीकारतानां ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2018
Total Views |
 
 
कृषी सहाय्यक लाच स्वीकारतानां  ताब्यात
जळगाव, 5 मार्च
प्रस्तावामध्ये असलेल्या त्रृटींची पुर्तता करून प्रस्ताव लवकर पुढील कारवाहीस पाठविण्यासाठी 1 हजार 500 रुपयांची लाच स्विकारतांना रामसिंग भोमसिंग पवार , कृषी सहाय्यक , तालुका कृषी अधिकारी यावल यांना रंगेहात ताब्यता घेण्यात आले आहे.
 
 
   तक्रारदार हे खासगी कंपनीत नोकरीस आहेत. ते शेतक­रयाचे ठिबक सिंचनचे अनुदान प्रस्ताव तयार करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल करून त्याचा पाठपुरावा करतात व प्रस्तावामध्ये असलेल्या त्रुटींची पुर्तता करतात.त्यांनी दाखल केलेल्या प्रस्तावाच्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी व प्रस्ताव लवकर पुढील कारवाहीस पाठविण्यासाठी सदर लोकसेवकाने तक्रारदार यांचेकडे 1 मार्च रोजी 1500 रुपये लाचेची मागणी केली. या बाबत तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरो जळगाव यांचेकडे तक्रार दिली. त्याची शहानिशा करून सापळा रचण्यात आला. ही 5 रोजी स्विकारतांना रामसिंग पवार यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई जी.एम.ठाकुर, पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि. जळगाव यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
@@AUTHORINFO_V1@@